शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम कर्ज अद्याप मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:16 AM2017-07-20T01:16:00+5:302017-07-20T01:16:00+5:30

बँकांचे कानावर हात : शासकीय धोरण ठरतेय तकलादू

Farmers have not yet received 10,000 rupees advance loan! | शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम कर्ज अद्याप मिळालेच नाही!

शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम कर्ज अद्याप मिळालेच नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट १.५ लाख रुपये कर्जमाफी जाहीर केली. सोबतच जे शेतकरी कर्जाचे हप्ते नियमित भरतात, त्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत शेतकऱ्यांना अग्रीम १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने मंजूर करण्याचे निर्देश होते; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अद्याप कुठल्याच शेतकऱ्यास १० हजार रुपये कर्ज देण्यात आलेले नाही. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही या स्वरूपातील कर्ज वाटप प्रक्रिया बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफीसंदर्भातील अटी, शर्ती आणि निकष शिथिल करीत १ एप्रिल २०१२ नंतरच्या व ३० जून २०१६ पर्यंतच्या थकीत पीक कर्जाला माफ करण्याचा निर्णय घोषित केला. त्यानंतर निर्णयात बदल होत २००९ पासून थकीत असलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र होतील, असे जाहीर झाले. दरम्यान, ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्व शाखांमधून तत्काळ दहा हजारांचे अग्रीम कर्ज देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले; मात्र २१ जून २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना राष्ट्रीयीकृत बँकांनी अद्याप ही प्रक्रियाच सुरू केलेली नाही.

शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम कर्ज देण्यासंदर्भात आरबीआयच्या कुठल्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळेच राष्ट्रीयीकृत बँकांनी या स्वरूपातील कर्ज वाटपास सुरुवात केलेली नाही. निर्देश प्राप्त झाल्यास तत्काळ अंमलबजावणी केली जाईल.
- विजय नगराळे,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

Web Title: Farmers have not yet received 10,000 rupees advance loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.