पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:42 PM2018-12-14T17:42:27+5:302018-12-14T17:44:02+5:30
शेतकऱ्यांनी गुरूवार, १३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची सांगता संबधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने १४ डिसेंबर रोजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात सापडली असून मोतसावंगा प्रकल्पातून कालव्यांव्दारे सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी निंबी (ता.मंगरूळपीर) येथील १५ शेतकऱ्यांनी गुरूवार, १३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची सांगता संबधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने १४ डिसेंबर रोजी करण्यात आली.
सन १९७२ पासून शेतकºयांना कालव्यांव्दारे पाणीपुरवठा केला जायचा. मात्र, मोतसावंगा, रामगाव, दुधखेडा आदी गावांमधील काही नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला. याशिवाय ज्या मशीनव्दारे पाणीपुरवठा व्हायचा, त्या मशीनची नासधूस केली. त्यामुळे पाणीपुरवठा कायमचाच बंद झाला असल्याने यासाठी आत्माराम आखरे, कनिराम जाधव, रमेश आडोळे, प्रकाश चव्हाण, श्रीकृष्ण मनवर, अनिल भगत, श्रीकृष्णा टोपले, सुभाष टोपले, जगन्नाथ इंगोले, गोपाल मनवर, अंबादास बेलखेडे, नंदकिशोर टोपले, शेषराव ठोंबरे, दयाराम आडोळे, नारायण वैरागडे उपोषणासाठी बसले होते. मशीनची नासधूस करणाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. यासंदर्भात वाशिम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासनाचे पत्र शेतकºयांना दिले असून त्यामध्ये प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील काही मंडळींनी अनधिकृतपणे कालव्याव्दारे पाणी सोडण्यात अडथळे आणले आहेत. कालव्याव्दारे पाणी सोडण्याकरिता पोलीस संरक्षण मागितले असून, सदर प्रक्रीया अंतीम टप्प्यात आहे. पोलीस संरक्षण प्राप्त होताच १७ डिसेंबर रोजी कालव्याव्दारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे म्हटल्याने शेतकºयांनी उपोषण सोडले.