विहीर कामातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी शेतकऱ्याचे उपोषण!
By admin | Published: July 17, 2017 02:30 AM2017-07-17T02:30:13+5:302017-07-17T02:30:13+5:30
वाशिम : विहीरीच्या कामात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सायखेडा (ता.मंगरूळपीर) येथील शेतकऱ्याने १५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विहीरीच्या कामात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सायखेडा (ता.मंगरूळपीर) येथील शेतकऱ्याने १५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
विहिरीच्या कामात निधी हडपणारे दोषी अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदाराविरूद्ध कठोर कारवाईची मागणी सायखेडा येथील उपोषणकर्ते ७० वर्षीय हरिभाउ तुकाराम डाखोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. हरिभाउ यांच्याकडे सायखेडा येथे गट नं.१४ मध्ये ६३ आर. कोरडवाहू शेतजमिन आहे. या शेतातील विहीरीचे शासकीय अनुदान लघूपाटबंधारे विभागातील मोरे व ठेकेदार मोंदळे यांनी गरीबीचा व अज्ञानाचा फायदा घेवून गंडविल्याचा उपोषणकर्त्याचा आरोप आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.