जऊळक्यातील शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास

By admin | Published: July 11, 2017 01:54 AM2017-07-11T01:54:53+5:302017-07-11T01:54:53+5:30

जऊळका रेल्वे : पारंपरिक पद्धतीने शेती करताना लागणारा वेळ , पैसा व श्रम पाहता शेतकरी आधुनिकतेकडे वळला आहे. कमी वेळात जास्त काम कसे करता येईल, याचा शोध सद्यस्थितीत शेतकरी घेताना दिसून येत आहे.

The farmers of Jawalka have adopted modernity | जऊळक्यातील शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास

जऊळक्यातील शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका रेल्वे : पारंपरिक पद्धतीने शेती करताना लागणारा वेळ , पैसा व श्रम पाहता शेतकरी आधुनिकतेकडे वळला आहे. कमी वेळात जास्त काम कसे करता येईल, याचा शोध सद्यस्थितीत शेतकरी घेताना दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील अनेक शेतकऱ्यांनी करुन शेतकरीही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.
शेतात डवरणी करायची म्हणजे बैलगाडी, जोडी, मनुष्य लागायचे व यामध्ये वेळही भरपूर जायचा; परंतु येथील अनेक शेतकऱ्यांनी एक सायकलचे चाक लोखंडी डवरा तयार करुन त्याच्यावर बसविले. सायकलच्या चाकामध्ये हवा भरल्या जात असल्याने ते लोटण्यास सोपे जाते व लोखंडी डवऱ्याचे वजन असल्याने ते जमिनीत जाऊन माती मोकळी होत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: The farmers of Jawalka have adopted modernity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.