कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा!
By admin | Published: April 9, 2017 08:07 PM2017-04-09T20:07:25+5:302017-04-09T20:07:25+5:30
शेलूबाजार (जि.वाशिम) : ग्राम पिंप्री अवगण येथील ५५ वर्षीय शेतकरी जयसिंग गेमा राठोड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या पोटात सुरी भोसकून आत्महत्या केली.
शेलूबाजार (जि.वाशिम) : ग्राम पिंप्री अवगण येथील ५५ वर्षीय शेतकरी जयसिंग गेमा राठोड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या पोटात सुरी भोसकून आत्महत्या केली. ही घटना ९ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथील जयसिंग राठोड यांच्याकडे दोन ते अडीच एकर शेती आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८४ हजार ७०० रुपये कर्ज असून सततच्या नापिकीमुळे त्याची परतफेड करणे त्यांना अशक्य झाले होते. जयसिंग राठोड हे मनमिळावू स्वभावाचे होते. ९ एप्रिल रोजी सकाळी मुले व पत्नी शेतात गेले; तर सुन व मुलीला विहीरीवर पाणी आणण्याकरिता पाठवून जयसिंग यांनी स्वत:च्या पोटात सुरी भोसकून आपली जीवनयात्रा संपविली. सून घरी परतल्यानंतर हा प्रकार पाहून तीने आजूबाजूच्या लोकांना आरडाओरड करुन बोलाविले. त्यानंतर जयसिंग यांना वाशिम येथे उपचारार्थ हलविण्यात आले असता, तिथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.