नाफेडच्या खरेदीअभावी मालेगावातील शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 08:24 PM2017-10-29T20:24:23+5:302017-10-29T20:26:21+5:30
शिरपूर जैन: मालेगाव येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसतानाच जिल्ह्यात इतर ठिकाणी नाफेडद्वारे उडिद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर मालेगाव येथे उडिद आणि मुगाला खरेदीदारही मिळेनासे झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: मालेगाव येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसतानाच जिल्ह्यात इतर ठिकाणी नाफेडद्वारे उडिद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर मालेगाव येथे उडिद आणि मुगाला खरेदीदारही मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रब्बीच्या तयारीसाठी शेतकºयांना पैसा जोडणे कठीण होऊन बसले आहे.
मालेगाव येथे यंदा उडिद, मुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला होता, तसेच या पिकाच्या क ालावधित पोषक वातावरण असल्याने बºयापैकी उत्पादनही झाले; परंतु ही पिके काढून बाजारात विक्रीस आणल्यानंतर शेतकºयांना नगण्य भाव मिळू लागले.अशात प्रशासनाकडून नाफेड खरेदीसाठी शेतमालाची नोंदणीही करण्यास सुरुवात करण्यात आली आणि शेकडो शेतकºयांनी त्यासाठी नोंदणीही करून घेतली; परंतु आता जिल्ह्यातील रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम या ठिकाणी नाफेडद्वारे उडिद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात माल नाफेडक डे हमीभावाने घेतला जात आहे. त्यामुळे बाजारातील व्यापाºयांना हमीभावाने माल घेणे परवडणारे नसल्याने त्यांनी या शेतमालाच्या खरेदीकडे पाठच फिरविल्याचे दिसते. असा प्रकार मालेगाव बाजार समिती आणि उपबाजार शिरपूर येथे दिसत आहे. त्यातच नाफेड केंद्र सुरू झाले नसून, वाशिम येथे माल घेऊन जाणे शेतकºयांना परवडणार नाही. त्यामुळे शेतकºयांना आपला माल कोठे विकावा हा प्रश्न पडला आहे. त्याशिवाय सोयाबीनचे हमीभाव ३०५० असताना मालेगाव आणि शिरपूर येथील बाजारात २४०० ते २६०० रूपये प्रति क्ंिवटलचेच भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकही मोठ्या अडचणीत आले आहेत.
-