शेतकऱ्यांच्या मालाची होणार थेट ग्राहकांना विक्री; बुधवारपासून वाशिममध्ये कृषी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:59 PM2018-02-20T16:59:05+5:302018-02-20T17:06:05+5:30
वाशिम : शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याची संधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाशिम : शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याची संधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवात या उपक्रमासोबतच कृषि प्रदर्शनी, पशू प्रदर्शन, शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रिय शेतमाल विक्री आदिंचा समावेश करण्यात आला आहे. सुंदरवाटिका येथील काटा कोंडाळा चौक येथे होणाºया या कृषि महोत्सवास भेट देवून नागरिकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव यांनी केले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार असून महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. याशिवाय इतरही मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कृषिविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण, समूह-गट संघटीत करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकºयांच्या मालास योग्य दर मिळावा व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा, याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीशृंखला विकसित करणे, कृषिविषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकºयांच्या समस्यांचे निवारण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा जिल्हा कृषि महोत्सवामागील मूळ उद्देश असल्याचे डॉ. जाधव यांनी कळविले आहे.