कृषिविषयक योजनांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ!

By admin | Published: April 30, 2017 02:37 AM2017-04-30T02:37:22+5:302017-04-30T02:37:22+5:30

अनुदान थेट खात्यात जमा; ऑनलाइन व्यवहारांविषयी माहितीचा अभाव.

Farmers move to agriculture related schemes! | कृषिविषयक योजनांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ!

कृषिविषयक योजनांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ!

Next

वाशिम : कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या योजनांमधील गैरप्रकारांवर आळा बसावा, या मूळ उद्देशाने कृषिविषयक योजनांचा लाभ ह्यऑनलाइनह्ण प्रणालीद्वारे देण्याचे धोरण शासनाने चालू महिन्यापासून अंगिकारले. त्यानुषंगाने योजनांच्या माध्यमातून मिळणारा पैसा ह्यआरटीजीएसह्णच्या माध्यमातून थेट लाभार्थी शेतकर्‍याच्या खात्यात जमा होणार आहे; मात्र नव्याने झालेला हा बदल पचनी पडत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी योजनांकडे पाठ फिरवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कृषी व पशूसंवर्धन विभागाने १३ एप्रिल २0१७ रोजी यासंबंधी मार्गदर्शक तत्त्व जारी केले. ह्यउन्नत शेती-समृद्ध शेतकरीह्ण ही मोहीम हाती घेऊन यापुढे कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या विविध स्वरूपातील योजनांचे अनुदान रोखीने अथवा धनादेशाद्वारे न देता शेतकर्‍यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
त्याची चोख अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमधून सुरू झाली आहे. कृषिविषयक योजनांच्या अंमलबजावणीत माहिती व तंत्रज्ञानाचादेखील मोठय़ा प्रमाणात वापर करण्यावर विशेष भर दिला जात असून, यासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणे सुरू आहे.

कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या योजनांची पारदर्शकपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने शासनाने योजनांचे अनुदान लाभार्थींच्या थेट आधार संलग्न खात्यात जमा करण्याची पद्धत अंगिकारली आहे. नव्याने झालेला हा बदल शेतकर्‍यांनी समजून घेणे गरजेचे आहे.
- अभिजित देवगिरीकर,
तालुका कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Farmers move to agriculture related schemes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.