नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:12 PM2017-10-27T13:12:11+5:302017-10-27T13:14:18+5:30
जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकºयांचा समावेश असतांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रलंबित दिसून येत असल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.
वाशिम : शेतात पावसातील खंड व कापणीनंतर पडलेल्या पावसामुळे सोयाबीन व कापसाच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकºयांचा समावेश असतांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रलंबित दिसून येत असल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. सदर पंचनामे त्वरित करण्याची मागणी शेतकºयांमधून केल्या जात आहे.
जिल्हयात बºयाच भागात असमाधानकारक पावसामुळे व वेळेवर पाऊस न पडल्याने अनेक भागातील शेतकºयांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतात आलेल्या सोयाबीन पिकांना शेंगाच लागल्या नाहीत तर काही शेतातील शेंगा चिंभडल्यात असे असतांना कृषी विभागाने पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देणे गरजेचे असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान पिक विमा योजनेतील शेतकºायंना याचा फायदा होतो परंतु कृषी विभाग दुर्लक्ष करीत असल्याने शेतकºयांचे नुकसानास सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून विमा कंपनीना तशा सूचना करणे आवश्यक झाले आहे. याकडे कृषी विभागानेही पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांकडून व्यक्त केल्या जात आहे. मालेगाव तालुक्यात शेतकºयांचे मोठे प्रमाण नुकसान झाले असून त्या पाठोपाठ मानोरा तालुक्याचा समावेश दिसून येतो.