जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 07:49 PM2017-11-13T19:49:20+5:302017-11-13T19:51:21+5:30

जयपूर सिंचन प्रकल्पाकरिता दोन वर्षांपूर्वी जमिनी घेवूनही त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करित असल्याने अखेर त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून जमिनीचा मोबदला मिळण्याबाबतची मागणी केली. 

Farmers to pay for the land! | जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर!

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर!

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपासून प्रश्न प्रलंबितप्रकल्पासाठी जमिनीचे संपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जयपूर सिंचन प्रकल्पाकरिता दोन वर्षांपूर्वी जमिनी घेवूनही त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करित असल्याने अखेर त्रस्त झालेल्या शेतक-यांनी सोमवारी जिल्हाधिका-यांची भेट घेवून जमिनीचा मोबदला मिळण्याबाबतची मागणी केली. 
यासंदर्भातील निवेदनात शेतक-यांनी नमूद केले आहे, की वाई, सावळी, झोडगा, जयपूर आदीठिकाणच्या शेतक-यांनी जयपूर सिंचन प्रकल्पासाठी आपापल्या जमिनी दिल्या. मात्र, मुल्यांकन आणि मुआवजा प्रक्रिया प्रलंबित असल्याने त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. याकडे उपविभागीय अधिकाºयांनीही दुर्लक्ष केले आहे. तथापि, संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे दर सद्याच्या रेडीरेकनप्रमाणे ठरवून तथा मुल्यांकन निश्चित करून जमिनीचा मोबदला तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी संबंधित शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे यावेळी केली. या निवेदनावर विशाल भोयर, कैलास मस्के, आनंदा गालट, प्रल्हाद राठोड, अविनाश राठोड, चंद्रभान राठोड, फुलसिंग राठोड, किसन भालेराव, विठ्ठल भालेराव, पांडूरंग राठोड, गरिबदास राठोड, विपीन भोयर यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. 

Web Title: Farmers to pay for the land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.