उत्पादक गटाचे शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:22 PM2017-11-29T13:22:02+5:302017-11-29T14:57:24+5:30

सन २०१६-१७ या वर्षात बिजोत्पादन केलेल्या बियाण्याचे उत्पादन अनुदान तसेच वितरण अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उत्पादक गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.

The farmers of the productive group were shocked at the District Collectorate! | उत्पादक गटाचे शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !

उत्पादक गटाचे शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !

googlenewsNext
ठळक मुद्देअनुदान देण्याची मागणी विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - सन २०१६-१७ या वर्षात बिजोत्पादन केलेल्या बियाण्याचे उत्पादन अनुदान तसेच वितरण अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उत्पादक गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकºयांनी उत्पादक गट स्थापन करून विविध उद्योगधंद्यांत पाय रोवण्याला सुरूवात केली आहे. शेतमालावर आधारित उद्योगधंदे उभारण्यासाठी शासनाकडून अनुदानदेखील देण्यात येते. सन २०१६-१७ या वर्षातील बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी सुरूवातीला कृषी विभागाशी चर्चा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गटातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळत असल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिला. यावेळी गजानन अवचार, पंजाबराव अवचार, विलासराव गायकवाड, उमेश वाझूळकर, रवींद्र बोडखे, माधव लहाने, शिवाजी भारती,  विठ्ठलराव लहाने आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली. उत्पादक गटातील शेतक-यांच्या मागण्या शासनदरबारी तसेच कृषी विभागाच्या संबंधित अधिका-यांपर्यंत पोहोचविल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले.

Web Title: The farmers of the productive group were shocked at the District Collectorate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी