‘एक्स्प्रेस वे’च्या विरोधासाठी शेतकरी धडकले तहसीलवर!
By admin | Published: August 2, 2016 01:48 AM2016-08-02T01:48:48+5:302016-08-02T01:48:48+5:30
‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे आणि कृषी समृद्धी हब’ ला विरोध करण्यासाठी तालुक्यातील रिधोरा, सुकांडा, इरळा, ब्राह्मणवाडा परिसरातील शेकडो शेतकरी मालेगाव तहसील कार्यालयावर धडकले.
रिधोरा : नागपूर ते मुंबई या प्रस्तावित ह्यसुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे आणि कृषी समृद्धी हबह्ण ला विरोध करण्यासाठी तालुक्यातील रिधोरा, सुकांडा, इरळा, ब्राह्मणवाडा परिसरातील शेकडो शेतकरी मालेगाव तहसील कार्यालयावर धडकले आहेत. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जिल्हय़ातील कारंजा तालुक्यातील १८ गावे, मंगरूळपीर १0 गावे, मालेगाव २0 गावे; तर रिसोड १ अशा ५९ गावांच्या ११0 किलोमीटर अंतरावरील शेतजमिनीतून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे जाणार आहे. यामध्ये शेकडो हेक्टर जमीन संपादीत केली जाणार असून, मालेगाव तालुका, शेलुबाजार व कारंजा तालु्क्यात कृषी समृद्धी हब बनविणे प्रस्तावित आहे. यामध्ये जमीन संपादित होणार असल्याने भूमिहीन होण्याची भीती शेतकर्यांना असून, ह्यएक्स्प्रेस वे आणि कृषी हबह्ण ला शेतकर्यांचा विरोध होत आहे. रिधोरा परिसरातील शेकडो शेतकर्यांनी एकत्रित येत सोमवारी मालेगाव तालुक्यातील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. रिधोरा, सुकांडा परिसरातील शेकडो शेतकर्यांच्या जमिनी बागायती असतानाही, महसूल दप्तरी याची नोंद नाही. जमिनी संपादित झाल्या तर अख्ख्या कुटुंबांना भूमिहीन होण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करून जमीन संपादनाला शेतकर्यांनी विरोध दर्शविला. कृषी समृद्ध हब करावयाचा असल्यास मालेगाव तालुक्यातील वरदरी परिसरात मोठय़ा प्रमाणात शासनाची इ-क्लास व वन विभागाची जमीन आहे. ही जमीन संपादित करून शासनाने कृषी हब उभारावा, असे शेतकर्यांनी निवेदनात म्हटले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे, शिवाजी केकन, संदीप सावळे, अनिल इंगोले, गजानन तारे, जैसिंगराव घुगे, विष्णू ठाकरे, जगन ठाकरे, विजय भालेराव, गणेश ठाकरे, बाबाराव घुगे, संतोष घुगे, विनोद घुगे, बबन पाटील यांच्यासह २00 ते ३00 शेतकरी उपस्थित होते.