कृषी सेवा केंद्रांवर शेतक-यांचा रांगा
By admin | Published: June 20, 2015 02:57 AM2015-06-20T02:57:14+5:302015-06-20T02:57:14+5:30
वाशिम जिल्हय़ात ४0 टक्के पेरण्या आटोपल्या; बियाणे तपासून पेरण्याचे आवाहन.
वाशिम : यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभालाच पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी बाजारात शेतकर्यांची मोठी गर्दी वाढली असून, अनेक ठिकाणी १९ मे रोजी कृषी सेवा केंद्रावर शेतकर्यांच्या रांगा दिसून आल्यात. हवे ते बियाणे व खते मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. गतवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्याने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. यावर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच वरुणराजाने कृपा केली असली तरी, पुन्हा हुलकावणी दिली तर काय, या चिंतेत असलेल्या शेतकर्यांनी पेरणी केली नाही; परंतु वेळेवर व समाधानकारक पाऊस वेळेवर होत असल्याने पेणीसाठी शेतकर्यांची एकच लगबग सुरू झाली. जिल्हय़ातील वाशिम तालुक्यामध्ये १७ जूनपर्यंत १५ ते २0 टक्के पेरणी झाली होती; मात्र सावरगाव, जांभरुण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने १0 टक्के शेतकर्यांची पेरणी उलटली. १८ जूनपासून नियमित पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांनी पेरणीसाठी गडबड करून कृषी सेवा केंद्र गाठले. कृषी सेवा केंद्रावर पाहिजे ते बियाणे व खते मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे.