२९ हजार शेतक-यांचे पीककर्ज पुनर्गठन

By admin | Published: July 18, 2015 02:16 AM2015-07-18T02:16:01+5:302015-07-18T02:16:01+5:30

पुनर्गठनाचा आकडा १८१.३४ कोटीवर.

Farmers reorganization of 29 thousand farmers | २९ हजार शेतक-यांचे पीककर्ज पुनर्गठन

२९ हजार शेतक-यांचे पीककर्ज पुनर्गठन

Next

वाशिम : शेतकर्‍यांचा रेटा आणि प्रशासनाचा दंडुका यामुळे १५ जुलैअखेर पीककर्ज पुनर्गठनाचा आकडा १८१.३४ कोटीवर गेला आहे. जिल्हय़ातील एकूण २९ हजार ६६८ शेतकरी लाभार्थींनी पुनर्गठनाचा लाभ घेतला आहे. २0१३ मधील अतवृष्टी, २0१४ मधील कोरडा दुष्काळ आणि २0१५ च्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यातील गारपिटीने शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावर पाणी फेरले. कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी अगोदरच गारद झालेला आहे. त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस, अल्प बाजारभावाने भर टाकली. शेतकर्‍यांना मदतीचा हात म्हणून २0१४-१५ या आर्थिक वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हय़ातील ९९ हजार १९४ शेतकरी सभासदांनी एकूण ६६३ कोटी ९८ लाख रुपयांच्या पीककर्जाचा लाभ घेतला होता. सदर शेतकरी पीककर्ज पुनर्गठनासाठी पात्र आहेत. पुनर्गठनास नकार देणार्‍या बँक प्रशासनाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. १५ जुलैपर्यंत विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी २९ हजार ६६८ शेतकरी लाभार्थींना १८१.३४ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाने १५८ शेतकर्‍यांचे १८.६ लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने १९५ शेतकर्‍यांचे १८.७ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ९५३ शेतकर्‍यांचे ७0 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने २११२ शेतकर्‍यांचे १.८६ कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाने ३८६ शेतकर्‍यांचे २९.८ लाख, एसडीएफसी बँकेने २२१ शेतकर्‍यांचे ३७.४ लाख, डीसीसी बँकेने २0 हजार ३६८ शेतकर्‍यांचे १0९.५६ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठण, अशी आकडेवारी आहे. २0१५ मध्ये मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावून गेला; मात्र हा आनंद जणू औटघटकेचा ठरत आहे.

Web Title: Farmers reorganization of 29 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.