कारंजा येथील आक्रोश सभेला शेतक-यांचा प्रतिसाद
By admin | Published: June 11, 2017 02:07 AM2017-06-11T02:07:25+5:302017-06-11T02:07:25+5:30
मान्यवरांची उपस्थिती; शासनाच्या कृषी धोरणाचा निषेध.
लोकतमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी ९ जून रोजी कारंजा येथील तहसील कार्यालय परिसरात शेतकरी आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तालुक्यातील शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कारंजा येथे आयोजित शेतकरी आक्रोश सभेत आमदार बच्चू कडू, शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, कारंजा-मानोराचे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके, डॉ. सुभाष राठोड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती.
१ जूनपासून राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राज्य शासनाच्या धोरणाबाबत शेतकरी आपला संताप व्यक्त केली आहेत. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालास योग्य हमीभाव, अशा विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सभेला संबांधित करताना आमदार बच्चू कडू म्हणाले, की राज्य शासन शेतकर्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंंत आम्ही गप्प बसणार नाही. त्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर टिकाही केली.
चंद्रकांत वानखडे , कारंजा-मानोराचे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके, डॉ. सुभाष राठोड , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनीही यावेळी शासनाच्या धोरणावर टीका करताना शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळाल्याशिवाय आंदोलन मिटणार नसल्याचे सांगितले.
या शेतकरी आक्रोश सभेला तालुक्यातील शेकडो शेतकर्यांची उपस्थिती होती. यावेळी पावसानेही हजेरी लावली होती.
राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपाला कारंजा तालुक्या चांगलाच प्रतिसाद लाभत असून, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धारही शेतकर्यांनी व्यक्त केला आहे.