रिसोड येथे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धांदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:57 AM2020-05-29T10:57:43+5:302020-05-29T10:58:10+5:30

पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसिल कार्यालयातही शेतकºयांची एकच गर्दी होत असल्याचे २७ व २८ मे रोजी दिसून आले.

 Farmers rush for crop loan at Risod! | रिसोड येथे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धांदल !

रिसोड येथे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धांदल !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : खरीप हंगाम जवळ येत असून, पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसिल कार्यालयातही शेतकºयांची एकच गर्दी होत असल्याचे २७ व २८ मे रोजी दिसून आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी लॉकडाउनमुळे शेतीविषयक कामे प्रभावित झाली होती. २० एप्रिलपासून शेतीविषयक कामांना संचारबंदीतून सुट मिळाल्यानंतर नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणी यासह शेती मशागतीच्या अन्य कामांना शेतकºयांनी गती दिली. आता शेती मशागतीची कामे पुर्णत्वाकडे आल्यानंतर खते, बियाण्याची जुळवाजूळव करण्यासाठी पीककर्ज काढण्याकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळत आहेत. दरम्यान, तालुक्यातील पुनर्गठण झालेल्या अनेक शेतकºयांना नवीन पीककर्ज मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. संबंधित बँकेने २०० ते २५० शेतकºयांचे परस्पर पुनर्गठण केल्याने आणि त्यांचे हप्ते न भरल्याने या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. यासंदर्भात फेब्रुवारी, मार्च महिन्यात शेतकºयांनी रिसोड येथे आंदोलनही केले होते. परंतू, अद्यापही त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. दुसरीकडे पीककर्जासाठी फेरफार आवश्यक केल्याने आणि फेरफार काढण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर तहसिल कार्यालयात शेतकºयांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असल्याने पीककर्जासाठी असलेली फेरफारची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पुजा अमोल भुतेकर यांनी २८ मे रोजी तहसिलदार अजित शेलार यांच्याकडे केली. यावर वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले जाईल, असे आश्वासन शेलार यांनी दिले.
 

आधार प्रमाणिकर अपूर्ण
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी आधार प्रमाणिकरण बंद करण्यात आले. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरूनही तालुक्यातील अनेक शेतकºयांना अद्याप कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. या शेतकºयांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title:  Farmers rush for crop loan at Risod!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.