शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी सोयाबीन जपून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:42 AM2021-02-11T04:42:54+5:302021-02-11T04:42:54+5:30

गतवर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला. ...

Farmers, save soybeans for sowing! | शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी सोयाबीन जपून ठेवा!

शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी सोयाबीन जपून ठेवा!

Next

गतवर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला. परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली. या समस्यांमुळे उत्पादन क्षमता खालावल्याने पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची निश्चितपणे टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादित सोयाबीन पूर्णत: विकून न टाकता काही सोयाबीन बियाण्यांसाठी जपून ठेवावे.

सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचे सोयाबीन आहे, त्यांनी घरीच तीनवेळा उगवणक्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास बियाण्याच्या अडचणीवर मात करता येऊ शकते. सोबतच दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांनासुद्धा बाजारभावाने बियाणे विक्री केल्यास त्यांनाही मदत होणार आहे. यातून संबंधित शेतकऱ्यास आर्थिक फायदादेखील होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीन पूर्णत: विकून न टाकता राखून ठेवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी घोडेकर यांनी केले आहे.

Web Title: Farmers, save soybeans for sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.