पैनगंगा बॅरेजचे पाणी वाशिम शहराला देण्याच्या निषेधार्थ शेतकरी चढले ‘टॉवर’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:47 PM2018-03-14T12:47:12+5:302018-03-14T14:44:26+5:30

वाशिम : शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्क शेतकरी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली.

Farmers storm the 'Tower' on the protest of giving water to Washim city! | पैनगंगा बॅरेजचे पाणी वाशिम शहराला देण्याच्या निषेधार्थ शेतकरी चढले ‘टॉवर’वर!

पैनगंगा बॅरेजचे पाणी वाशिम शहराला देण्याच्या निषेधार्थ शेतकरी चढले ‘टॉवर’वर!

Next
ठळक मुद्देबॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाºया ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले हाते. १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा परिषद जवळील पवनचक्की टॉवरवर दोन शेतकरी चढले व आंदोलन केले. टॉवरवर चढणाऱ्यांमध्ये सायखेडा येथील अहीरे , सोनगव्हाण येथील उध्दव ढेकळे यांचा समावेश आहे.

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता न देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाईपलाइन अंथरण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्क शेतकरी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. वृत्त लिहिस्तोवर शेतकरी टॉवरवरच असून प्रशासनाच्यावतिने त्यांना उतरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाºया ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले हाते. दरम्यान, २१ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांसह इतर हजारो नागरिकांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.  पैनंगगेत अर्धनग्न होवून आंदोलन केले. शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि शेतकºयांना बारमाही पिके घेता येणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. असे असताना बॅरेजेस परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता वाशिम शहराला बॅरेजेसमधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. असा आरोप कोकलगाव परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे केला होता. बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पुरविणे अन्यायकारक असून वाशिमला न देण्यासाठी तिव्र विरोध वाढला होता.  या विरोधामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नगर परिषदेच्यावतिने  वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना अंतर्गत पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरीता पोलीस अधिक्षकांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यासाठी पोलीस अधिक्षकांनी ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, १३ महिला कर्मचारी व एक आरसीपी प्लाटूनच असा तगडा बंदोबस्त कामाच्या ठिकाणी तैनात करीत पाइपलाइनच्या कामाला  प्रारंभ झाला . ही बाब परिसरातील शेतकऱ्यां ची थट्टा असल्याचे शेतकऱ्यां चे म्हणणे असून १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा परिषद जवळील पवनचक्की टॉवरवर दोन शेतकरी चढले व आंदोलन केले. टॉवरवर चढणाऱ्यांमध्ये सायखेडा येथील अहीरे , सोनगव्हाण येथील उध्दव ढेकळे यांचा समावेश आहे.

Web Title: Farmers storm the 'Tower' on the protest of giving water to Washim city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.