विविध मागण्यांसाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:21+5:302021-01-08T06:09:21+5:30
मालेगाव तालुक्यातील तरोडी व खरोडी येथील सिमेंट व स्टोन क्रशर प्लांटच्या (गिट्टी खदान) धुळीमुळे तूर, हरभरा, करडी, गहू या ...
मालेगाव तालुक्यातील तरोडी व खरोडी येथील सिमेंट व स्टोन क्रशर प्लांटच्या (गिट्टी खदान) धुळीमुळे तूर, हरभरा, करडी, गहू या पिकाचे नुकसान होत आहे. टीन लावून शेतात जाणारे रस्ते अडविण्यात आल्याने शेतात जावे कसे, असा प्रश्न शेतक-यांना पडला. गिट्टी खदान व सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींशी करार न केलेल्या शेतक-यांच्या शेतातही साहित्य टाकण्यात आल्याने नुकसान होत असल्याचे शेतक-यांनी निवेदनात नमूद केले. याप्रकरणी न्याय मिळावा आणि गिट्टी खदान परिसरातील ५०० मीटर अंतरातील शेतक-यांना प्रतिवर्षी भरपाई द्यावी, अडविलेले रस्ते मोकळे करावे, शेतातील साहित्य उचलून न्यावे आदी मागण्या शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख यांच्यासह शेतकरी गजानन भिलंग, कुंडलिक भिलंग, संजय काटे, प्रकाश काटे, भागवत काटे, विनोद काटे, धोंडबाराव वाघ, सुभाषराव वाघ, अनिल देशमुख, दत्तराव देशमुख, नीळकंठ देशमुख २५ शेतक-यांनी केल्या. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला.