खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:34 AM2021-01-09T04:34:07+5:302021-01-09T04:34:07+5:30
----- वीज देयक वसुलीस स्थगिती द्यावी ! किन्हीराजा : कोरोनाच्या काळात अनेक नागरिकांचा लघू व्यवसाय ठप्प झाला. अद्यापही हे ...
-----
वीज देयक वसुलीस स्थगिती द्यावी !
किन्हीराजा : कोरोनाच्या काळात अनेक नागरिकांचा लघू व्यवसाय ठप्प झाला. अद्यापही हे व्यवसाय पूर्णपणे रुळावर आलेले नाहीत. त्यात शेतकऱ्यांनाही विविध संकटांचा सामना करावा लागला. आता महावितरणकडून थकीत वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत असल्याने थकबाकीदारांची पंचाईत झाली असून, वीज देयकाची वसुली सद्यस्थितीत स्थगित करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी केली.
---
डव्हा ते मेडशी रस्त्याचे काम अपूर्ण
मेडशी: डव्हा ते मेडशी पालखी रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्णच आहे. त्यामुळे भाविकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलामार्फत संत नगरी शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गत दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते; परंतु अद्यापही हे काम पूर्णत्वाकडे जाऊ शकले नाही.
-----------
शिकस्त वर्गखोलीच्या दुरुस्तीची प्रतीक्षा
मानोरा: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गुंडी येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेची एक वर्ग खोली पावसाळ्यात कोसळली . सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आता पाच महिने उलटले तरी या वर्गखोलीची दुरुस्ती झालेली नाही. पुढील सत्रापूर्वी ही वर्गखोली दुरुस्त करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.