वैरणसाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:39+5:302021-04-04T04:42:39+5:30

वाशिम : दरवर्षीच्या तुलनेत यंदा कुटाराची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच आता रानात हिरवा चारादेखील उपलब्ध नसल्याने गुरांसाठी वैरण ...

Farmers struggle for fodder | वैरणसाठी शेतकऱ्यांची धडपड

वैरणसाठी शेतकऱ्यांची धडपड

Next

वाशिम : दरवर्षीच्या तुलनेत यंदा कुटाराची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच आता रानात हिरवा चारादेखील उपलब्ध नसल्याने गुरांसाठी वैरण गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.

ग्रामीण प्रवाशांना कोरोनाचा विसर

वाशिम : शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका येथून विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. ही वाहने खचाखच भरून जात असून ग्रामीण प्रवाशांनाही कोरोनाचा विसर पडल्यागत स्थिती निर्माण झाली.

वाहन परवाने मिळताहेत वेळेत

वाशिम : कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे वाहन परवाना मिळण्यास अर्ज केलेल्या अनेकांना चार ते पाच महिन्यांपासून परवाना मिळालेलाच नाही. हा प्रश्न आता मार्गी लागला असून लवकरच परवाने मिळतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्राप्त झाली.

कागदपत्रे ग्रामस्तरावर उपलब्ध करावी

केनवड : विविध योजनांच्या अंमलबजावणीस होणारा परिणाम लक्षात घेता घरकूल योजनेसह शेतीसंबंधी कागदपत्रे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन

मेडशी : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत मेडशी परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गुरुवारी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

नवनिर्मित महामार्गाच्या पुलावर खड्डा

शेलूबाजार: शेलूबाजार-चिखली दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शेतानजीकच्या पुलावर तांत्रिक चुकांमुळे खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे येथून वाहने उसळत आहेत. प्रामुख्याने दुचाकी चालकांना त्याचा त्रास होत असल्याने पुलावरील खोलगट भाग समतल करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

मानोरा परिसरात तीन सापांना जीवदान

वाशिम : वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी शुक्रवारी विविध ठिकाणी आढळून आलेल्या तीन सापांना पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. त्यात मानोरा शहरात आढळलेला गवत्या, मानोरा धामणीत आढळलेला नाग आणि वनोजा येथे आढळलेल्या सापाचा समावेश होता.

रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित

रिठद : गत दोन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने रिठदसह रिसोड तालुक्यातील रोजगार सेवकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. प्रलंबित मानधन देण्याची मागणी रोजगारसेवक संघटनेने २ एप्रिल रोजी पंचायत समितीकडे केली.

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण

वाशिम : जिल्ह्यातील गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्थांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी दिली.

पर्यटकांअभावी शिरपुरात लघू व्यवसाय ठप्प

शिरपूर जैन : कोरोना संकटावर नियंत्रणासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन हटविण्यात आला असला तरी अद्याप संसर्गाची भीती पूर्णत: ओसरलेली नाही. यामुळे पर्यटकांनीही भ्रमंती करणे सुरू केले नसल्याने यंदा जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरपुरातील लघुव्यवसाय बहुतांशी ठप्प पडला आहे.

वाशिम पोलिसांनी रात्र गस्त वाढविली

वाशिम : चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाशिम पोलिसांनी रात्र गस्त वाढविली आहे. कुठेही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पादचारी मार्गावर अतिक्रमण

वाशिम : येथील श्री शिवाजी विद्यालयापासून आंबेडकर चौकापर्यंतच्या पादचारी मार्गावर अतिक्रमण झाले आहे. लघु व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी मनीष डांगे यांनी केली.

Web Title: Farmers struggle for fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.