नादुरुस्त बंधाऱ्यामुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:50+5:302021-09-21T04:46:50+5:30
मानोरा : तालुक्यातून वाहणाऱ्या अरुणावती नदीवर गाव तेथे कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. उन्हाळ्यात जनावरांना पिण्याचे पाणी साठून राहावे ...
मानोरा : तालुक्यातून वाहणाऱ्या अरुणावती नदीवर गाव तेथे कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. उन्हाळ्यात जनावरांना पिण्याचे पाणी साठून राहावे हा या पुढील उद्देश. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नदीला पूर आल्याने धामणि मानोरा, कोंडोली येथील बंधारा वाहून गेला होता व काही ठिकाणी बंधारे नादुरुस्त झाले आहेत. ते आतापर्यंत दुरुस्त केले नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून या नादुरुस्त बंधाऱ्याची कधी दुरुस्ती होईल? असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत. तसेच वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
धामणि(मानोरा)येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची एक बाजू पुरामुळे वाहून गेली आहे. त्यामुळे नदीच्या पलीकडे येथून शेतकरी यांना जाता येत नाही. शेती मधील कामे प्रभावित झाली आहेत. बंधारा दुरुस्त करावा. याकरिता ग्रामपंचायतने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे दुरुस्ती प्रस्ताव टाकला आहे.
- दीपा अभिजित पाटिल, सरपंच, ग्रामपंचायत धामणि(मानोरा)