कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:09+5:302021-06-26T04:28:09+5:30
-------- नाल्यांच्या सफाईअभावी आरोग्याला धोका वाशिम : कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथे नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने ...
--------
नाल्यांच्या सफाईअभावी आरोग्याला धोका
वाशिम : कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथे नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने शुक्रवारी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आहे.
---------
पुलावरील कठडे जीर्ण
वाशिम : मानोरा तालुक्यातील कारंजा ते मानोरा मार्गादरम्यान अडाण नदीवर सुमारे ४५ वर्षांपूर्वी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. आता या पुलावरील सिमेंटचे संरक्षक कठडे जीर्ण झाले आहेत. एखादवेळी कठडे खचून अपघात घडण्याची भीती आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-------
पाण्याच्या टाक्यांची साफसफाई
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे गतवर्षी २९ जुलै रोजी पाण्याच्या टाकीत अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. आता यंदा हा प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायतीने या पाण्याच्या टाकीची त्वरित सफाई केली.