शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:21 PM2019-11-09T15:21:49+5:302019-11-09T15:22:10+5:30

शासकीय खरेदी सुरू झालेली नसतानाच जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीन, मुग, उडिद या शेतमालाचे दर चांगलेच वाढू लागले आहेत.

Farmers turn their backt to government procurement! | शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसाने खरीप पिकांचे अति नुकसान झाल्यानंतर बाजारात मात्र शेतमालाचे दर सतत वाढत आहेत. त्यात बहुतांश शेतमालाची खरेदी ही शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक दराने व्यापारी करीत आहेत. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी प्रक्रियेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली होती. त्यातील तूर आणि कपाशी वगळता सर्वच पिकांची काढणी झाली. तथापि, पावसामुळे सोयाबीनचे काढणी पश्चात नुकसान झाले, तर कपाशीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही पावसामुळेच मुग आणि उडिद पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना बाजारातही अपेक्षीत दर मिळत नव्हते. या पृष्ठभुमीवर शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी शेतकरी क रीत होते. या मागणीनुसार जिल्ह्यात शासकीय खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली. मंगरुळपीर, वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे नोंदणी कें द्र सुरू करून शेतकºयांची नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. तथापि, अद्याप शासकीय खरेदी सुरू झालेली नसतानाच जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीन, मुग, उडिद या शेतमालाचे दर चांगलेच वाढू लागले आहेत.
या तिन्ही शेतमालाची शासनाच्या हमीपेक्षा अधिक दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे. शासनाने सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना बाजार समित्यांत या शेतमालाची ३७५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत आहे. मुगाला ७०५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना या शेतमालास व्यापाºयांकडून ७००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत, तर उडिदाला ५७०० रुपये हमीदर घोषीत केला असताना या शेतमालाची प्रति क्विंटल ८००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दराने खरेदी होत आहे. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी केंद्रावर शेतकरी दिसणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

खरेदी प्रक्रियेसाठी शेतकºयांना एसएमएसही नाही
शेतकºयांकडून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यात शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.या पाचही केंद्रांवर मिळून आजवर ६२६ शेतकºयांनी शेतमालाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक ४६५ शेतकºयांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी १३९ शेतकºयांनी उडिदाच्या विक्रीसाठी, तर केवळ २२ शेतकºयांनी मुगाची विक्री करण्यासाठी नोंंदणी केली आहे. शेतकºयांची नोंदणी गत महिनाभरापासून सुरू असल्याने खरेदी प्रक्रियेला सुरुवात होणे अपेक्षीत आहे; परंतु अद्याप पाचपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर कोणत्याच प्रकारच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच काही ठिकाणी शेतकºयांना शेतमाल आणण्यासाठी एसएमएसही पाठविल्याची माहिती नाही.


शाासनाकडून शासकीय खरेदी प्रक्रीयेची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. ही तारीख निश्चित झाल्यानंतर शासन निर्देशानुसारच जिल्हयातील प्रत्येक केंद्रावर शेतकºयांनी नोंदणी केलेल्या शेतमालाची खरेदी प्रक्रीया सुरु करण्यात येईल. तथापि, सद्यस्थितीत ही खरेदी कधी सुरु होईल हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही
-रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक
वाशिम

Web Title: Farmers turn their backt to government procurement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.