पीक नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतिक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 03:12 PM2019-05-05T15:12:27+5:302019-05-05T15:12:38+5:30
वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे ६७०० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे ६७०० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सन २०१८ मधील खरीप हंगाम जिल्ह्यातील २ लाख १ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. १६ आॅगस्ट २०१८ ते १९ आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. जवळपास ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने कृषी व महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार शासनाकडे सविस्तर अहवाल पाठविण्यात आला होता. तसेच ४८ तासांच्या आत पीकविम्याची जबाबदारी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे शेतकºयांनी नुकसानभरपाई संदर्भात तक्रारही केली होती. त्याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेताची पाहणी पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने केल्यानंतर, या नुकसानाबद्दल केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम शेतकºयांना मंजूर करण्यात आली. पीकविम्याबद्दल वैयक्तिक नुकसान झालेल्या शेतकºयांच्या यादीची पडताळणी पीकविमा कंपनीकडून गत तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे. अद्याप पडताळणीच सुरू असल्याने नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना मिळाली नाही. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यानेही व्यत्यय निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. आॅगस्ट २०१८ च्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने संबंधित यंत्रणेने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.
आॅगस्ट २०१८ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी यासंदर्भात संबंधितांकडे पाठपुरावाही करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईचा फटका शेतकºयांना बसत आहे.
- विश्वनाथ सानप
सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प.
आॅगस्ट २०१८ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. संबंधित विमा कंपनीने याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे. शेतकºयांच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये.
- चरण गोटे, प्रगतशील शेतकरी