शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
By admin | Published: July 7, 2017 01:42 PM2017-07-07T13:42:19+5:302017-07-07T13:42:19+5:30
शेतकरी पुन्हा दमदार पावसाची प्रतिक्षा करू लागला आहे.
मानोरा : गत १० दिवसांपासून तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे कोरडवाहू शेतीमधील नुकतीच उगवलेली पिके सुकत आहेत. तर अनेकांची पेरणी अद्याप बाकी आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंतेचे ढग दाटले असून, शेतकरी पुन्हा दमदार पावसाची प्रतिक्षा करू लागला आहे.
यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पासावने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. त्यानंतर काही काळ चांगला पाऊस पडला. तेव्हा बियाणे चांगल्या प्रकारे उगवले; परंतु पिके बहरत असताना पावसाने १० दिवसांपासून दडी मारली. तर तालुक्यातीलच काही भागात अद्याप पेरणीलायक पाऊस न पडल्यने नागरिकांच्या पेरण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. काहींच्या पेरण्या रखडल्या तर ज्यांनी पेरणी केली त्यांचय पेरण्या उलटण्याची शक्यता दिसून येत आहे.