शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:45+5:302021-06-25T04:28:45+5:30
^^^^^^^ पाणंद रस्त्याचे काम रखडलेलेच वाशिम : कारंजा तालुक्यातील लोहगाव परिसरातील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली ...
^^^^^^^
पाणंद रस्त्याचे काम रखडलेलेच
वाशिम : कारंजा तालुक्यातील लोहगाव परिसरातील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी सरपंचांकडे गुरुवारी केली.
--------------------
वाशिम-पुसद मार्गावर वाहतूककोंडी
वाशिम : वाशिम-पुसद महामार्गावरील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात धान्य घेऊन येणा-या वाहनांची पुसद-वाशिम महामार्गावरील दगड उमराफाट्यानजीक मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा ग्रामस्थांना त्रास होत आहे.
-------
सिंचन प्रकल्पाच्या पातळीत वाढ
वाशिम : दमदार पावसामुळे कारंजा तालुक्यातील उंद्री येथील सिंचन प्रकल्पाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जवळपास १२ दिवसांपूर्वी २५ टक्क्यांहून कमी जलसाठा असलेल्या या प्रकल्पातील जलसाठा आता ४० टक्क्यांवर पोहोचला आहे.
----
पेरणीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन
वाशिम : कारंजा तालुका कृषी विभागाच्या वतीने पेरणीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत कामरगाव परिसरातील काही गावांत कृषी सहायकांनी शेतक-यांना मार्गदर्शन करून पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया घेण्याचे आवाहन केले.
-------