तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 04:28 PM2020-02-03T16:28:13+5:302020-02-03T16:28:28+5:30
शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ली : नाफेडकडे नोंदणी केल्यानंतर तूर विक्री न झालेल्या शेतकºयांना एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तत्कालिन सरकारने केली होती. गत दोन वर्षापासून कार्ली परिसरातील शेकडो शेतकºयांना अद्याप सदर अनुदान मिळाले नाही.
सन २०१८ च्या खरीप हंगामातील तुर पिकाकरिता नाफेडअंतर्गत शेतमालाला आधारभूत किंमतीप्रमाणे रास्त भाव मिळण्यासाठी तुर खरेदी केंद्र सुरू केले होते. शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही. शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत शेतमाल खरेदी न झालेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल १ हजार प्रमाणे अनुदान देण्याचे शासनाचे जाहिर केले होते. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात अन्यत्र झाली आहे. कार्ली परिसरातील शेकडो शेतकºयांना अद्याप अनुदान मिळाले नाही. बँकेत जावुन बँक खात्यात अनुदान जमा झाले का, हे पाहण्यासाठी अनेक शेतकरी चकरा मारत असल्याचे दिसून येते. नवीन सरकारने तरी तूर अनुदानाचे पैसे द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अगोदरच नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कधी पावसाचा अनियमितपणा तर कधी अवकाळी पाऊस व गारपिट यामुळे शेतकºयांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनुदानाचेही पैसे मिळत नसल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढत आहे. दोन वर्षानंतरही अनुदान मिळत नसल्याने प्रशासकीय दिरंगाई समोर येत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, टाळाटाळ केली जाते, असा आरोपही कार्ली परिसरातील शेतकºयांनी केला.
माझ्या शेतातील तुर या शेतमालाची हमीभावाने विक्री व्हावी म्हणून नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी सन २०१८ ला केली होती. मात्र दोन वर्र्षे लोटली तरी अद्याप अनुदानाचा पत्ता नाही. याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारमध्येही तक्रार केली होती. त्यावर लवकर निर्णय घेण्याचे कबुल करणाºया अधिकाºयांना अजुनही याबाबत वेळ मिळाला नाही. संबंधित अधिकारी हे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या समक्ष वेळ मारुन नेतात, ते आमच्या सारख्या शेतकºयाना काय वेळ देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-व्दारकाबाई घमराव देशमुख,
रा. कार्ली ता.जि.वाशिम