धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:23 PM2018-08-03T14:23:12+5:302018-08-03T14:25:52+5:30

शेतकऱ्यांना मोबदला ७ आॅगस्टपर्यंत देण्यात याव्यात अन्यथा ८ आॅगस्ट रोजी धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Farmers' warning to fast on the wall of dam | धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

Next
ठळक मुद्देउमरा शम., काजळांबा येथील शेतकऱ्यांच्या जमीनीची संयुक्त मोजणी २०१६ मध्ये झाली. रळ खरेदीसाठीचा मुल्यांकन प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाशिमकडे प्रलंबीत आहे. भिंतीवर बसुन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  वारा जहॉगीर सिंचन प्रकल्पाचे पाणी अतिरिक्त शिरुन उमरा शम. येथील ३० शेतकऱ्यांच्या जमीनी बाधीत   झाल्या, तसेच शेतकऱ्यांच्या संयुक्तिक मोजणी होवून मोबदला मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांना मोबदला ७ आॅगस्टपर्यंत देण्यात याव्यात अन्यथा ८ आॅगस्ट रोजी धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
उमरा शम., काजळांबा येथील शेतकऱ्यांच्या जमीनीची संयुक्त मोजणी २०१६ मध्ये झाली. त्याचा सरळ खरेदीसाठीचा मुल्यांकन प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वाशिमकडे प्रलंबीत आहे. त्यांच्या जमीनीचे कागपत्रानुसार हंगामी बागायतीचे दर द्या , संयुक्त मोजणीपासुन आज पावेतो प्रतिवर्षी १० टक्के पिक नुकसान भरपाई म्हणुन अतिरिक्त मोबदला द्या ही कार्यवाही ७ आॅगस्ट पर्यंत पुर्ण करा, अन्यथा  ८ आॅगस्ट  २०१८ पासुन  वारा जहॉगीर सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर बसुन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
सदर निवेदनावर हरिभाऊ रामजी कºहाळे, विठ्ठल इंगळे, प्रकाश येवले, माधव कºहाळे अंबादास मापारी, प्रल्हाद उगले, सुरेश सा.मापारी, देविदास मापारी, गंगाराम मापारी, धनाजी इंगळे, पांडूरंग काजळे, अशा ११ शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Farmers' warning to fast on the wall of dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.