शेतातील साहित्य जाळले
By Admin | Published: June 20, 2014 12:05 AM2014-06-20T00:05:35+5:302014-06-20T00:13:56+5:30
नेतन्सा शेत शिवारातील शेतामध्ये ठेवलेले शेतीचे साहीत्य रात्री जाळून टाकण्याची घटना घडली
शिरपूर : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत नेतन्सा शेत शिवारातील शेतामध्ये ठेवलेले शेतीचे साहीत्य अवगत इसमाने मंगळवारी रात्री जाळून टाकण्याची घटना घडली असून सदर घटनेमध्ये एक लाख रुपयाचे शेतीचे साहीत्य जळून खाक झाले अशी फिर्याद नुकसान ग्रस्त शेतकरी गजानन लक्ष्मण बाजड यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला दिली. फिर्यादी गजानन बाजड रा.नेतन्सा यांनी आपल्या फिर्यादीत नेतन्सा शेतशिवार गट १.१४0 सर्वे ५१ मध्ये आपली पाच एकर ओलीताची शेती असून सदर शेतामध्ये हस्ती कंपनीचे स्प्रिकंलरचे एकूण ८0 पाई व इतर साहीत्य अज्ञात इसमाने जाळून टाकले सदर कृत्य करणार्याने शेतातील अन्य झाले, आंबा, निंबु, व पेरुची झाडे सुद्धा जाळून टाकली त्यामुळे आपले सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कानडे व तलाठी विनोद वाघ यांनी पंचनामा केला असून शासनाने आपणास त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाजड यांनीकेली.