दिवाळीच्या पृष्ठभूमीवर कापड बाजारात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:46 PM2017-10-17T19:46:25+5:302017-10-17T19:48:28+5:30
दिवाळीच्या पृष्ठभूमीवर महिलांकडून विविध विविध रंगांच्या आणि आधुनिक साड्यांना चांगली मागणी आहे़ कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पाटीर्वेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विजयादशमी पाठोपाठ दिवाळीच्या पृष्ठभूमीवर गेले काही महिने जीएसटी व मंदीच्या वातावरणातून कापड बाजार बाहेर आला असून, बाजारात तेजी आल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ रेडीमेड आणि शुटींग, शर्टिंगसह लाहन मुलांचे कपडे आणि साड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी विविध दुकानांत होत आहे.
दिवाळीच्या पृष्ठभूमीवर महिलांकडून विविध विविध रंगांच्या आणि आधुनिक साड्यांना चांगली मागणी आहे़ कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पाटीर्वेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे़ खास दिवाळीसाठी कापड विके्रत्यांनी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे़ सध्या बदलत्या ट्रेंड व फॅशननुसार विविध प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत़ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका व चित्रपटात वापरण्यात आलेल्या साड्यांचीही सध्या क्रेझ महिलांमध्ये दिसून येते़
सिल्कमध्ये विविध प्रकार बाजारात आले असून, त्यात मॉडर्न कलरना चांगली मागणी आहे़ साड्यांमध्ये कंची, कांजीवरम, स्टोनवर्क, नेट वर्क, चिकन, गोटापत्ती वर्क आदी साड्यांना मागणी आहे़ पुरुष आणि युवावर्गासाठी पठाणी कुर्ता, सिंघम शर्ट, चेक्स कॉटन शर्ट, पँट असे विविध प्रकार उपलब्ध आहेत़ त्याशिवाय जॅकेट, कुडत्याला मागणी वाढली आहे़ त्यात ट्रॅडिशनल कलरबरोबरच ब्रॉईट कलरना पसंती वाढत आहे़ दिवाळी व पाठोपाठ येणाºया लग्नसराईमुळे पुढील दोन ते तीन महिने कापड बाजारपेठेत चांगलीच वर्दळ पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत अपुरा पाऊस आणि त्यामुळे घटलेल्या कृषी उत्पादनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजारांत मंदिचे सावट होते; परंतु आता दिवाळीसाठी खरेदी करताना ग्राहकांची गर्दी होत असून, गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सध्या कापड बाजारात खरेदीचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे एका कापड विक्रेत्याने सांगितले.
यंदा साड्यांमध्ये ज्यूट आणि ड्युपिंन सिल्क, लिनन, भागलपुरी, हे नवीन प्रकार बाजारात आले असून, त्याला चांगली मागणी आहे़ पुरुषांसाठी रेडिमेडमध्ये प्रिंटेट कापडांना अधिक मागणी असून, यामध्ये बँ्रडेड कंपन्यांच्या कापड खरेदीवर अधिक जोर दिसत आहे. लोकांना ट्रॅडिशनल लुक हवा असतो; पण त्याच्या जोडीला वेस्टर्न कलरला पसंती दिली जात आहे़ बाजारात अनेक नवीन कलर आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे़
- सावन राऊत, कापड व्यावसायिक वाशिम