पालिकेतील सेवानिवृत्तांचे सहा दिवसांपासून उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:08 PM2017-10-22T22:08:31+5:302017-10-22T22:16:34+5:30
कारंजा लाड : अकोला वाशिम जिल्हा सेवानिवृत्त सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघ शाखा कारंजाच्यावतीने थकित वेतन व इतर देयकांच्या पुर्ततेसाठी १६ आॅक्टोंबरपासून कारंजा न.प. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे; परंतु अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल न.प. प्रशासनाने अद्यापही घेतली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : अकोला वाशिम जिल्हा सेवानिवृत्त सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघ शाखा कारंजाच्यावतीने थकित वेतन व इतर देयकांच्या पुर्ततेसाठी १६ आॅक्टोंबरपासून कारंजा न.प. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे; परंतु अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल न.प. प्रशासनाने अद्यापही घेतली नाही.
कारंजा न.प.मधील सेवानिवृत्त कर्मचाºयांचे माहे आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याचे निवृत्त वेतन तसेच सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम देण्याबाबत कारंजा न.प. प्रशासनाला संघटनेच्यावतीने लेखी निवेदन सादर करण्यात आले होते. तसेच कारंजा न.प. मुख्याधिकारी यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाºयांनी मागण्यांबाबत चर्चाही केली. त्यानंतर माहे आॅगस्ट या महिन्याचे सेवानिवृत्त वेतन काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली;परंतुु दिवाळी हा महत्वपूर्ण सण असल्यामुळे सेवानिवृत्तांना माहे आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याचे निवृत्ती वेतन व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावयास पाहिजे होती, मुख्याधिकाºयांनी केवळ एक महिन्याचे वेतन कबुल केले तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम नाकबुल केली.
विशेष म्हणजे मुख्याधिकाºयांनी नियमित न.प.कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा केली आहे. बरेचशे सेवानिवृत्त कर्मचारी विविध आजारांनी ग्रस्त आहे. त्यांना औषधोपचारांकरिता दरमहा पैशाची अत्यंत आवश्यकता असते. याच मागण्यांसाठी निवृत्त कर्मचºयांनी कारंजा न.प.कार्यालयासमोर १६ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. दिवाळीच्या सुटी काळातही सेवानिवृत्त कर्मचाºयांनी उपोषण सोडले नाही. दिवाळी सारख्या महत्वपूर्ण सणादरम्यान सेवानिवृत्त कर्मचारी बेमुदत उपोषण करीत आहेत. जोपर्यंत मागण्यांची पुर्तता होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार तसेच वेळप्रसंगी आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही या निमित्ताने देण्यात आला आहे.
सेवानिवृत्त कर्मचाºयांचे केवळ महिनाभराचे वेतन थकित आहे. त्याशिवाय सहाव्या वेतन आगोगातील फरकाची रक्कम ुदेण्याची त्यांची मागणी आहे. कोणत्याही सेवानिवृत्तावर अन्याय होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे; परंतु त्यांचे सर्व उपदान आणि वेतन पालिकेला स्वत:च्या निधीतूनच अदा करावे लागते. सध्या निधी नसल्यामुळे ते प्रलंबित आहेत. निधी उपलब्ध होताच. त्यांचे थकित वेतन आणि इतर मागण्या निकाली काढू.
- प्रमोद वानखडे, मुख्याधिकारी, न.प. कारंजा.