वाशिम जिल्हा परिषदेसमोरील उपोषणाची सांगता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 02:38 PM2018-06-01T14:38:30+5:302018-06-01T14:50:36+5:30
वाशिम : बनावट स्वाक्षरी करून ग्रामपंचायत सचिवाने ठेकेदाराच्या सहाय्याने लाखो रुपयांचा निधी काढला असून, याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या जोडगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या उपोषणाची सांगता गुरूवारी सायंकाळी झाली.
वाशिम : बनावट स्वाक्षरी करून ग्रामपंचायत सचिवाने ठेकेदाराच्या सहाय्याने लाखो रुपयांचा निधी काढला असून, याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या जोडगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या उपोषणाची सांगता गुरूवारी सायंकाळी झाली. याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी दिले.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जोडगव्हाण येथील रमा राहूल कांबळे सरपंच कांबळे यांनी नमूद केले आहे की, सचिवाने ठेकेदाराच्या मदतीने शासनाचा लाखो रुपयांचा निधी आपली बनावट सही करून हडप केला. याबाबत दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. बनावट सही करणाºया सचिवाला निलंबीत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व शासनाची फसवणूक केल्याबद्दल दंड वसूल करण्यात यावा, या मागणीसह महिला सरपंचाचा हक्क डावलणाºया सचिवावर प्रशासकीय कारवाई करावी, सरपंचाला अंधारात ठेवून जनसुविधा योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता असलेला निधी दलित वस्तीत खर्च न करता अन्यत्र खर्च केल्याप्रकरणी कारवाई करावी तसेच जोडगव्हाण येथे नियमीत ग्रामसेवक द्यावा, आदी मागण्यांसाठी कांबळे यांनी २८ मे पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. ३१ मे रोजी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दीपक खडसे, तालुका सचिव विनोद पट्टेबहादूर , टनका येथील सरपंच राधेश्याम गोदारा यांच्या मध्यस्थीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आश्वासन दिल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सभापती सुधीर पाटील गोळे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, सरपंचांच्या या मुद्याच्या अनुषंगाने गावातील दुसºया बाजूनेही ३१ मे रोजी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. संबंधित कंत्राटदाराने ‘कमिशन’ न दिल्याने खोटी तक्रार देण्यात आली, १४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्यापपर्यंत खर्च केला नाही, ग्रामपंचायतचे खाते, रोजगार हमी, जनसुविधा, चौदावा वित्त आयोगाचे खाते गोठलेले आहे, ग्रामपंचायत सरपंच या महिला असून त्यांचे अधिकार हे त्यांचे पती भूषवितात, त्यामुळे ते शासकीय कामात नेहमीच अडथळा आणतात, असा आरोप विरोधकांनी या उपोषण आंदोलनात निवेदनाद्वारे केला. शौचालय बांधकाम झालेल्या लाभार्थींना पैशाची मागणी करतात. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दुसºया गटाने केली. या उपोषणाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, जि.प. सदस्य चक्रधर गोटे, दीपक खडसे, विनोद पट्टेबहादूर , टनका येथील सरपंच राधेश्याम गोदारा यांनी भेट दिली . याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी दिल्याने या उपोषणाचीदेखील सांगता झाली.