सिंचन विहीर दुरूस्तीसाठी उपोषणाचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:37 PM2019-01-14T15:37:56+5:302019-01-14T15:38:04+5:30

बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे

Fasting for the repair of irrigation well | सिंचन विहीर दुरूस्तीसाठी उपोषणाचा इशारा 

सिंचन विहीर दुरूस्तीसाठी उपोषणाचा इशारा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे. या संदर्भात संबंधित शेतकºयांनी कांरजा तहसीलदारांना निवेदन देऊनही दोन वर्षांंपासून सदर सिंचन विहीर दुरूस्तीसाठी आर्थिक मदत केल्या गेली नसल्याने शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. 
बांबर्डा येथील शेतकरी विनायक लक्ष्मण वानखडे व भास्कर शालिकराम कानकिरड यांची बांबर्डा शेतशिवारात सर्व्हे नं. ५/३ व सर्व्हे नं. ४५ मध्ये शेती असून त्यामध्ये सदर शेतकºयांच्या सिंचन विहिरी आहेत. तालुक्यात २०१६ च्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सिंचन विहीरी खचल्याने विहीरी संपूर्णपणे गाळल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना सिंचन करणे कठिण झाले आहे. शासनाने अतिवृष्टीमुळे खचलेल्या सिंचन विहीरीची दुरूस्ती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेतून करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित शेतकºयांनी सिंचन विहीर दुरूस्तीसाठी दोन वेळा कारंजा तहसीलदारांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर खचलेल्या विहीरींचा संबंधित तलाठ्यांकडून पंचनामाही करण्यात आला; परंतु दोन वर्ष उलटले तरी, विहीरीची दुरूस्ती करण्यात आली नाही. एकीकडे शासन स्तरावरून शेतकºयांचे उत्पन्न करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत, दुसरीकडे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सिंचन विहीर दुरूस्तीसाठी शेतकºयांना वारंवार प्रशासनदरबारी येरझारा घालाव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी व्यथीत झाले असून, या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकºयांनी पुन्हा ११ जानेवारीला तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. महिनाभरात विहिरींची दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Fasting for the repair of irrigation well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.