मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांच्या नशिबी केवळ संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 01:00 PM2020-10-07T13:00:33+5:302020-10-07T13:02:14+5:30

Corona warriors, Washim अद्याप कोरोनायोद्धा यांच्या कुटुंबियांना विमा कवचाची रक्कम मिळाली नाही.

The fate of the families of the dead Corona warriors only struggles | मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांच्या नशिबी केवळ संघर्ष

मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांच्या नशिबी केवळ संघर्ष

Next

वाशिम : कोरोनाकाळात कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत जिल्ह्यातील पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणारी मदत अद्याप मिळाली नाही. कोरोनायोद्धा यांनी कोरोनाशी लढा दिला; आता त्यांच्या कुटुंबियांवर मदतीसाठी जणू लढा देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांची अंमलबजावणी शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोविड-१९ च्या कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाºयाच्या कुटुंबियांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यात कोरोनाशी लढताना आतापर्यंत पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पाच जणांचे प्रस्ताव तालुकास्तरावरून जिल्हा प्रशासन आणि जिल्हास्तरावरून शासनाकडे तातडीने जाणे अपेक्षीत आहे. परंतू, अद्याप कोरोनायोद्धा यांच्या कुटुंबियांना विमा कवचाची रक्कम मिळाली नाही. साधे सांत्वनही झाले नसल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली.



माझे पती राजेश निमकंडे हे कोरोनाकाळात जनतेची सेवा करताना जग सोडून गेले. त्यांच्या सेवेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे; परंतु या संदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारची विचारणा झाली नाही ही खंत असून, अद्याप कुठली मदतही मिळाली नाही.
-वनिता राजेश निमकंडे, अकोला
राजेश यांच्या पत्नी

माझी पत्नी कांचन मलिकचे नगर परिषदेंतर्गत जनतेची सेवा करताना कोरोना संसर्गामुळेच ३ सप्टेंबरला निधन झाले. तिने जिवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्याचा विचार केला. तिच्या या कार्याचा मला अभिमान आहे; महिना उलटला तरी आर्थिक मदत नाही; शिवाय साधे सांत्वनही करण्यात आले नाही.

- नटवर परशराम मलिक, कांचन यांचे पती


माझे वडिल मानोरा पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. जनतेची सेवा करताना कोरोना संसर्गामुळे त्यांचे १० सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांनी स्वत:ची पर्वा न करता जनसेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमानच आहे; परंतु प्रशासन, शासनाकडून साधी चौकशीही नाही. याचे मोठे दु:ख वाटते.

-वैभव साठे, अशोक साठे यांचा मुलगा

 

कोविड-१९ कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यात असे किती कर्मचारी आहेत आणि त्यांच्या संबंधित यंत्रणांनी या संदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत का, त्याची विस्तृत माहिती घेऊ.लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. - हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

 

 

 

 

 

 

Web Title: The fate of the families of the dead Corona warriors only struggles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.