निकालात कारंजा तालुका घसरला!
By admin | Published: June 14, 2017 02:41 AM2017-06-14T02:41:55+5:302017-06-14T02:41:55+5:30
कारंजा तालुक्याचा निकाल ८६.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यात तालुका तिसऱ्या स्थानी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने ७ मार्च ते २७ मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल १३ जुन रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये कारंजा तालुक्याचा निकाल ८६.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यात तालुका तिसऱ्या स्थानी आहे.
कारंजा तालुक्यातून ३ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून त्यापैकी ३ हजार १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रावीण्यात ८३९, प्रथम श्रेणी ११६७, व्दितीय श्रेणी ९१५, तर १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कारंजा तालुक्यातील ७ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून त्यामध्ये तारांगण इंग्लिश स्कुल धनज, आर.जे.चवरे विद्यालय कारंजा, जे.सी. हायस्कूल कारंजा, कंकुबाई कन्या शाळा कारंजा, जे.डी.चवरे विद्यामंदिर कारंजा, बाबुसिंग राठोड विद्यालय लोहगाव, शोभनाताई चवरे विद्यालय काळी कारंजा या शाळांचा समावेश आहे. जेसी चवरे हायस्कूल कारंजा १०० टक्के, मुलजी जेठा हायस्कूल कारंजा ४७.६९, एम. बी. आश्रम हायस्कूल कारंजा ९६.४३, आर. एल. मूूल कन्या हायस्कूल कारंजा ६४.७०, कंकूबाई कन्या हायस्कूल कारंजा १०० टक्के, विवेकानंद हिंदी हायस्कूल कारंजा ४३.४७, जेडी चवरे विद्यामंदिर कारंजा १०० टक्के, विश्वभारती विद्यालय कारंजा ८८.४२, अनवर उर्दू हायस्कूल कारंजा ९१.०४, मुलजी जेठा उर्दू हायस्कूल कारंजा ९२. ४५, जिप हायस्कूल कामरगाव ८७.८७, नृसिंह सरस्वती विद्यामंदिर बेलखेड ७५.००, अनवर उर्दू हायस्कूल कामरगाव ९५.३१, महात्मा गांधी आश्रम शाळा लोहगाव ९५.००, बाबूसिंगजी राठोड विद्यालय लोहगाव महागाव १००, जिल्हा परिषद विद्यालय उंबर्डा बाजार ६८.९३, भारतीय विद्यालय मनभा ९२.४२, गुलामनबी आझाद उर्दू हायस्कूल कारंजा ८६.४८, वसंत विद्यालय पोहा ७३.१७, विद्याभारती माध्य विद्यालय शहा ७६.४७, बाबासाहेब धाबेकर हायस्कूल काकडशिवणी ८४.०९, ज्ञानप्रसारण विद्यालय खेर्डा बु. ८४.७८, ज्ञानप्रकाश विद्यालय काजळेश्वर ८९.३९, कृष्णप्रभा विद्यालय खेर्डा कारंजा ९०.६९, मोहनलालजी भन्साळी हायस्कूल धनज बु. ७७.९८, ज्ञानप्रकाश विद्यालय धनज खु ९३.८४, राष्ट्रीय संज तुकडोजी महाराज विद्यालय झोडगा ७२.०९, जगदंबा विद्यालय भागमदेवी ७०.३७, ज्ञानदीप विद्यालय लोणीअरब ९१.६६, यशवंत विद्यालय वाई कारंजा ८६.७६, रामराव आदिक विद्यालय शेलूवाडा ८८.८८, हरिभाऊ नाईक आश्रम शाळा शेवती ९१.१७, बाबासाहेब नाईक विद्यालय पिंप्री फॉरेस्ट ७९.३१, प्रतिभा विद्यालय शिवण बु. ७५.००, ताराबाई लाडकर विद्यालय ९१.३०, सुलभाताई इंगोले विद्यालय वापटी-कुपटी ९३.३३, बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी, ८१.८१, बाबसाहेब धाबेकर विद्यालय पसरणी ९०.१६, सोपीनाथ महाराज विद्यालय येवता ८२.३५, शहीद ए. खाल उर्दू माध्यमिक विद्यालय कारंजा ८९.१८, पी. जी. गावंडे विद्यालय कारंजा ९१.६६, मातोश्री जनाबाई चव्हाण माध्यमिक विद्यालय मोखड ८०.६४, आप्पास्वामी विद्यालय वढवी ९४.२८, हजरत अबुबकर सिद्धिकी उर्दूृ हायस्कूल ९३.३३, सरस्वतीबाई ताथोड विद्यालय खेर्डा (काळी) ९२.३०, स्व. टी. कारादेमध विद्यालय दोनद बु. ७०.००, हजरत आयेशा आरजे उर्दू हायस्कूल काजळेश्वर ७६.००, मो. नूर उर्दू माध्य विद्यालय उंबर्डा ९५.६५, इंग प्रि. एसव्ही हायस्कूल काळी कारंजा १०० टक्के, ब्लू चिप कॉन्व्हेंट कारंजा ९५.५२, आरजे चवरे शाळा कारंजा १००, मॉर्डन उर्दू हायस्कूल काळी कारंजा ५२.९४, शोभनाताई चवरे विद्यालय काळी कारंजा ९२.८५, द इंडियन इंग्लिश स्कूल कारंजा ३३.३३, गोविंद इंग्लिश स्कूल ९५.३४, श्रीराम गुंजाटे पब्लीेक स्कूल कारंजा ९२.५९, तारांगण इंग्लिश स्कूल धनज बु. १०० टक्के, सांदिपनी विद्यालय कारंजा ८६.२०. अशी शाळांची टक्केवारी ठरली आहे.