नराधम बापाचा १५ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:47 PM2019-07-23T14:47:41+5:302019-07-23T14:47:59+5:30
वाशिम : एका लहान मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी सुटून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षाच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार केला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एका लहान मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी सुटून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षाच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार केला. रक्ताच्या नात्यांना आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराची फिर्याद पिडित मुलीने २२ जुलै रोजी वाशिम ग्रामीण पोलिसांत दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी बापाविरूद्ध गुन्हे दाखल केले.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे वास्तव्यास असलेली १५ वर्षीय पिडित मुलीची आई ती लहान असतानाच मरण पावली; तर बापाने आपल्याच सख्ख्या लहान मुलीची हत्या केल्याच्या गुन्ह्यात तो सात वर्षे अमरावती व वाशिमच्या कारागृहात बंदिस्त होता. यादरम्यानच्या काळात पिडित मुलगी कोंडाळा झामरे येथे आजोबा व आजी यांच्याजवळ राहत होती. दोन महिन्यापूर्वी पिडितेचा बाप लखन (काल्पनिक नाव) हा कारागृहातून सुटला. एक महिना पुणे येथे मजूरीचे काम करून तो महिन्याभरापूर्वी कोंडाळा झामरे येथील घरी परतला. तेव्हापासून पिडित मुलगी त्याच्याजवळ राहायला लागली.
यादरम्यान नराधम बापाने आपल्याच सख्ख्या मुलीशी जोरजबरदस्तीने शारिरीक सलगी करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तीला अनेकवेळा विशिष्ट प्रकारच्या गोळ्या खावू घातल्या. २१ जुलैच्या रात्री तो पिडित मुलीला मोटारसायकलवर बसवून आत्याच्या घरी नेवून सोडण्याचा बहाणा करून घेवून जात असताना आजी-आजोबांसह काका आदिंनी त्यास प्रतिकार करून पिडित मुलीची सुटका करून घेतली. याप्रकरणी २२ जुलै रोजी पिडित मुलीने वाशिम ग्रामीण पोलिसांत नराधम बापाविरूद्ध तक्रार दाखल केली.
त्यावरून पिडितेच्या बापाविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगीता भारव्दाज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आरोपी बापास अटक
सात वर्षांपूर्वी आपल्याच सख्ख्या लहान मुलीची हत्या करणाºया आणि त्यानंतर आता स्वत:च्याच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार करणाºया नराधम आरोपी बापास ग्रामीण पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.