Father's Day : १४ अंध मुलांच्या आयुष्यात आनंद भरणारा डोळस बाप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 02:00 PM2019-06-16T14:00:36+5:302019-06-16T14:01:48+5:30

वाशिम  : तालुकयातील एकदम छोटयाशा गावात झोपडीत राहणारा, स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना तारेवरची कसरत होत असतानाही केकतउमरा येथील ‘पांडुरंग’ १४ अंध मुलांचा जन्म न देता बाप झाला आहे.

Father's Day: 14 Blessings in the life of blind children | Father's Day : १४ अंध मुलांच्या आयुष्यात आनंद भरणारा डोळस बाप 

Father's Day : १४ अंध मुलांच्या आयुष्यात आनंद भरणारा डोळस बाप 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : तालुकयातील एकदम छोटयाशा गावात झोपडीत राहणारा, स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना तारेवरची कसरत होत असतानाही केकतउमरा येथील ‘पांडुरंग’ १४ अंध मुलांचा जन्म न देता बाप झाला आहे. त्यांच्या पालन पोषणासह शिक्षणाची जबाबदारी तो आवर्जुन पार पाडत असून त्याच्या या उपक्रमाची अनेकांनी दखल घेवून मदतीचा हातही पुढे केला आहे.
वाशिम तालुक्यातील अतिशय छोटसे व शहरापासून अतिशय जवळ असलेले केकतउमरा गाव. केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर हे आपल्या गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना व अंध मुलगा चेतन यांच्यासोबत आपल्या संसाराचा गाड हाकत असतांना आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले. पाहता पाहता त्यांच्या झोपडीत १४ मुले जमा झालीत. आज त्यांच्या शिक्षणाच्या सोईसह त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास ते वडिलांचे कार्य पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याची माहिती एवढया दूरपर्यंत पोहचली की अनेकांनी त्यांच्या झोपडीला भेट देवून त्यांच्या कार्याची दखल घेतली. विशेष म्हणजे काही वर्षाआधी वाशिम येथे समाजसेवक अण्णा हजारे आले असता त्यांनी स्वताहून तुमच्या जिल्हयात पांडुरंग नावाचा कोणी एक व्यक्ती आहे. जे समाजकार्य करतात त्यांना मला भेटायचे असे म्हटले. लगेच उपस्थितांनी पांडुरंग उचितकर असे नाव सांगतातच त्यांच्या घरी गेले, त्यांची भेट घेतली व त्यांच्या या कार्याचे कौतूक केले. आजच्या घडीला उचितकर यांची झोपडी ‘चेतन सेवांकुर’या नावाने ओळखल्या जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व अंध विद्यार्थी स्वता रोजगार उपलब्ध करुन पांडुरंगाला संसार चालवितांना मदत करतांना दिसून येत आहेत. चेतन उचितकर यांनी एक आर्केस्टा काढून लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमासह शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करीत आहेत. रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करुन ते शहरातील मंदिरे, मुख्य चौकात विकून पैसा मिळवितांना दिसून येतात. विशेष म्हणजे त्यांना कोणीही विचारले की तुमचे नाव , गाव काय तर ते स्वताचे नाव व पुढे पांडुरंग उचितकर सांगत आहेत.

Web Title: Father's Day: 14 Blessings in the life of blind children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.