अर्धवट मार्गावर अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:24+5:302021-07-16T04:28:24+5:30

^^^^^ गावकऱ्यांकडून पर्जन्यमानाची नोंद वाशिम : जिल्ह्यात समृद्ध गाव स्पर्धेंत ग्रामस्थांना पाणी फाउंडेशन व प्रशासनाकडून जलसंधारणासह विविध कामांबाबत मार्गदर्शन ...

Fear of an accident halfway | अर्धवट मार्गावर अपघाताची भीती

अर्धवट मार्गावर अपघाताची भीती

Next

^^^^^

गावकऱ्यांकडून पर्जन्यमानाची नोंद

वाशिम : जिल्ह्यात समृद्ध गाव स्पर्धेंत ग्रामस्थांना पाणी फाउंडेशन व प्रशासनाकडून जलसंधारणासह विविध कामांबाबत मार्गदर्शन करण्यात आलेच, शिवाय पर्जन्यमानाच्या नोंदीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्या आधारे गावकरी नियमित पर्जन्यमानाची नोंद घेत आहेत.

---------------

वीजवाहिनीमुळे अपघाताचा धोका

वाशिम : कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे काही घरांवरून मुख्य वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. वीजवाहिनी घराच्या छतापासून अवघ्या दोन फूट उंचीवर आहे. एखादवेळी वादळवाऱ्याने ही वाहिनी तुटल्यास अपघाताचा धोका आहे.

-------

पुलाचे काम अर्धवट

काजळेश्वर : येथून जवळच असलेल्या उकर्डा येथील उमा नदीपात्रावर पुलाचे काम सुरू असतानाच गतवर्षी पावसामुळे पात्रात पाणी जमा झाल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे पेरणीच्या कामात अडथळे येणार असल्याचे दिसत आहे.

^^^^^^^^^^^

कामरगावच्या बाजारपेठेत गर्दी

कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे शनिवारी दिसून आले. कामरगावसह परिसरातील गावांत कोरोना संसर्ग पसरत असतानाही कामरगावातील ग्रामस्थांत कोरोना संसर्गाची भीतीच नसल्याचे त्यामुळे स्पष्ट होत आहे.

----------------

रोहयोच्या कामाची देयके प्रलंबित

वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकाम दुरुस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांनी साहित्य उधारीवर घेत विहिरींचे काम केले; मात्र गेल्या दीड वर्षांपासून कुशल कामांचा निधी मिळाला नाही.

^^^^^^^^^

घरकुल लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा

वाशिम : शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत मानोरा तालुक्यातील आसोला येथील लाभार्थींना घरकुल मंजूर झाले; परंतु या लाभार्थींच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ताच जमा झाला नाही. त्यामुळे घरकुल मंजूर होऊन फायदा तरी काय, असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत.

Web Title: Fear of an accident halfway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.