लस घेतल्यानंतर काेराेना पाॅझिटिव्ह आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:44+5:302021-02-23T05:01:44+5:30

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट दाराशी येऊन ठेपली आहे. त्याचा सामना करण्यासाठी कोरोना योद्धांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षेसाठी २२ हजार ...

Fear among staff after Kareena tested positive for the vaccine | लस घेतल्यानंतर काेराेना पाॅझिटिव्ह आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

लस घेतल्यानंतर काेराेना पाॅझिटिव्ह आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

Next

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट दाराशी येऊन ठेपली आहे. त्याचा सामना करण्यासाठी कोरोना योद्धांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षेसाठी २२ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे. नजीकच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन आढळत असलेल्या कोरोना रुग्णांची व मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही कोरोनाने बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी, समाजातील प्रत्येकाला त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य, पोलीस, महसूल, नगरपरिषदांमधील ‘फ्रंट लाइन वर्कर्स’ म्हणून काम करणाऱ्यांना लस देण्यात येत आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींमधील ६३६ कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी निवड झाली असून, यातील बहुतांश जणांना लस देण्यात आली आहे. नगरपरिषदेमधील पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याला लस देण्यात आली हाेती. त्या कर्मचाऱ्यामध्ये पुन्हा काेराेनाचे लक्षण जावणल्याने त्याने पुन्हा टेस्ट केली असता, ताे त्यामध्ये काेराना पाॅझिटिव्ह आल्याने नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. या संदर्भात आराेग्य विभागाशी संपर्क साधला असता, एकदा लस घेतल्यानंतर डाेज पूर्ण हाेत नाही. दाेन डाेज घेतल्यानंतर काही कालावधीनंतर लस काम करीत असल्याचे सांगण्यात आले. पाॅझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याने एकच डाेज घेतला असल्याची माहिती त्याच्या विभागप्रमुखांनी दिली.

--------------

कर्मचाऱ्यांना झालेले लसीकरण

आराेग्य कर्मचारी : ३,६३३

पाेलीस कर्मचारी : १,५९७

नगरपरिषद : ४२६

महसूल कर्मचारी : ५०६

खासगी क्षेत्र : २९२

...........................................

एकूण : ६,४५४

-------------

लस घेतल्यानंतर काही जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह येत असल्यास घाबरून जाण्याचे काही कारण नाही. संपूर्ण डाेज पूर्ण व काही कालावधी गेल्यानंतरच लस उपयाेगी ठरते. यामुळे लस उपयाेगी नाही असे नाही. काेणीही घाबरून न जाता लस घ्यावी.

- डॉ.अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: Fear among staff after Kareena tested positive for the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.