कोरोना लसीकरणाविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:44+5:302021-04-02T04:43:44+5:30

शासनाच्या निर्देशानुसार कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीने ४५ वर्षे वयावरील नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण सुरू केले असून, या लसीकरणाचा ...

Fear in the minds of the general public about corona vaccination | कोरोना लसीकरणाविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीती

कोरोना लसीकरणाविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीती

Next

शासनाच्या निर्देशानुसार कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीने ४५ वर्षे वयावरील नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण सुरू केले असून, या लसीकरणाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीने घरोघरी भेटी देत जनतागृती सुरू केली आहे. यासाठी स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व ग्रा. पं. सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करून देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील कोरोना लसीकरणाची भीती दूर करण्यासाठी कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, ही लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, हे पटवून देण्यासाठी कामरगाव ग्रामपंचायत सरपंच साहेबराव तुमसरे, ग्रामसेवक गोपाल मिसाळ, तलाठी विवेक नागलकर व ग्रा. पं. सदस्य गजानन हळदे हे घरोघरी भेटी देत जनजागृती करीत आहेत.

Web Title: Fear in the minds of the general public about corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.