खाजगी गोदामात माल ठेवणे भोवणार

By admin | Published: July 3, 2014 11:44 PM2014-07-03T23:44:21+5:302014-07-04T00:04:12+5:30

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेले बी-बियाण,रासायनिक 0खते,कीटकनाशके कृषी सेवा केन्द्राच्या गोदामात ठेवण्याच्या प्रकरण आहे.

Fearing to keep the goods in the private godown | खाजगी गोदामात माल ठेवणे भोवणार

खाजगी गोदामात माल ठेवणे भोवणार

Next

मानोरा : तालुक्यात विविध योजनेच्या माध्यमातूने शेतकर्‍यांना वाटपासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेले बी-बियाण,रासायनिक खते,कीटकनाशके राधाकृष्ण कृषी सेवा केन्द्राच्या गोदामात ठेवण्याच्या प्रकरणाची दखल घेऊन वाशिम येथील जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण २ जुलै रोजी पथकासह मानोरा येथे चौकशीकरिता दाखल झाले.यामुळे हे प्रकरण तालुका कृषी विभागाला महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे.
मानोरा येथील तालुका कृषी विभागांतर्गत शेतकरी बांधवाकरिता ज्वारी, उडीद, मुंग, तूर, सोयाबीन बियाणे तसेच युरिया, सल्फेट, तननाशक आणि किटकनाशक आदी साहित्य शासनाकडून तालुका कृषी विभागाला पुरविण्यात आले होते. मानोरा येथील राधाकृष्ण कृषी सेवा केंद्र यांच्या खाजगी गोडावूनमध्ये तालुका कृषी विभागाने सदर माल कुठलाच करार न करता ठेवला. याविरोधात १ जुलैला प्रा.ओम बलोदे,सुजाता शेरे, मनोज खडसे आणि संतोष पुरी यांनी पुढाकार घेऊन कृषी अधिकारी गुलाब राठोड सोबत गोडावूनची पाहणी केली असता राधाकृष्ण कृषी सेवा केंद्राच्या बी-बियाणे व रासायनिक ठेवण्याच्या गोडावूनमध्ये तालुका कृषी विभागाचा माल व राधाकृष्ण कृषी सेवा केंद्राचा माल आढळून आला.
यामुळे वाशिम येथील जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी इंगळे, तंत्रअधिकारी सचिन कांबळे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उलेमाले हे तालका कृषी विभागाच्या कार्यालयात येवून सदर प्रकरणाची चौकशीला सुरूवात केली. यात प्रामुख्याने तालुका कृषी विभागाकडे गोडावून भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे हंगामात शासनाकडून येणारे साहित्य, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक आदी साहित्य नाममात्र २ हजार रूपये भाड्याने देता येते. तीन महिन्याचे ६ हजार देता येते.कृषी सेवा केंद्र संचालकांना परवाना देताना त्या परवान्यात तरतूद केलेली असते असे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.
शेतकर्‍यासाठी पाठविलेला माल शेतकर्‍यापर्यंत पोहोचला नसेल परस्पर विक्री केला असल्यास सदर अधिकारी, कर्मचारी याची गय केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी आपण विभागीय आयुक्त अमरावती तसेच सहसंचालक यांच्याकडे दाद मागणार वेळप्रसंगी आमरण उपोषण करू असे प्रस्तुत प्रतिनिधी बोलताना अनौपचारिक बोलताना सांगीतले प्रा.ओम बलोदे यांनी सांगीतले.

Web Title: Fearing to keep the goods in the private godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.