तरूणाई तंबाखूच्या आहारी

By admin | Published: May 30, 2014 09:45 PM2014-05-30T21:45:35+5:302014-05-31T00:51:09+5:30

वाशिम जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानही सुरूच

Feeding of Tobacco Tobacco | तरूणाई तंबाखूच्या आहारी

तरूणाई तंबाखूच्या आहारी

Next

वाशिम : शासनाने मोठा गाजावाजा गुटख्यावर बंदी घातली असली तरी अन्न औषध प्रशासन विभागाकडुन या गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे तरूणाई गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक चित्र सद्या दिसून येत आहे. गुटखाबंदी प्रमाणेच सार्वजनिक ठिकाणच्या धूम्रपान बंदीचाही फज्जाचा उडाला आहे. बसथांब्यावर किंवा फुटपाथवर थांबले असता, बाजूला कोणी सिगारेट फुंकत असल्याचा अनुभव लोक वेळोवेळी घेतच असतात, त्यावेळी काय वाटते, त्याचा प्रचंड त्रास तेथून जाणार्‍या लोकांना होत असतो किंवा कॉलेजजवळ, रुग्णालयांजवळ शहरात अनेक ठिकाणी सिगारेट ओढणारे महाभाग दररोज दिसत असतात. यावेळी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर असलेली बंदी उठविली की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

Web Title: Feeding of Tobacco Tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.