कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ५० शेतकºयांचा सत्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:17 PM2017-10-18T15:17:56+5:302017-10-18T15:18:34+5:30
वाशिम: राज्यशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या महाकर्जमाफीस बुधवार, १८ आॅक्टोंबर २०१७ पासून प्रारंभ झाला. यानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ५० शेतकºयांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३४ हजार कोटीची आतापर्यंतची सर्वात मोठी महाकर्जमाफी राज्यातील शेतकºयांना दिली आहे. या ऐतिहासिक महाकर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील निवडक दोन शेतकºयांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमात मुंबई येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक आदी मान्यवर उपस्थित होते.