लाखाळा येथे कर्तृत्ववान लेकींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:34+5:302021-01-08T06:10:34+5:30
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालरोग तज्ज्ञ तथा समाजसेवक डॉ. विजय कानडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाच्या ...
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालरोग तज्ज्ञ तथा समाजसेवक डॉ. विजय कानडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी महिला प्रदेश सदस्य किरण गिऱ्हे, ग्रामीण बँकेचे मॅनेजर वानखेडे व माळी युवा मंच अध्यक्ष नागेश काळे यांची उपस्थिती होती. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्याध्यापिका गीता जाधव, आदर्श शिक्षिका छाया उलेमाले, वंदना इंगोले, रेखा सातव, संध्या पिंजरकर, वैशाली खंडारे, कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल कृषी साहाय्यक मीनाक्षी तायडे (उलेमाले), सामाजिक कार्याबद्दल छाया मडके आणि कोरोना काळात सेवा करतानाच पालात राहणाऱ्या गरीब मुलांना शिकविण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या महिला पोलीस संगीता ढोले यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. कानडे यांनी मनोगतात अशा कार्यक्रमातून आपणास गरजवंतांना मदत करण्याची प्रेरणा मिळते, असे म्हटले. आभार प्रदर्शन सविता मोहळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन राऊत यांनी तर सूत्रसंचालन तंत्रशिक्षक कैलाश वानखेडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक केशव खासभागे, प्रशांत मोहळे, प्रवीण उलेमाले, संदीप भांदुर्गे, अरुण इंगोले, कैलाश भांदुर्गे, समाधान गिऱ्हे, सुनील गाडेकर, संदीप वानखेडे, वासुदेव खंडारे, राजू खोटे आदींनी परिश्रम घेतले.