मंगरुळपीर येथे वृद्ध कलावंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 03:54 PM2018-12-04T15:54:26+5:302018-12-04T15:54:59+5:30
मंगरुळपीर : आपल्या विविध कलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात समाज प्रबोधन करणाºया जेष्ठ वृद्ध लोककलावंतांचा येथील हुडको कॉलनी स्थित संत गजानन महाराज संस्थान येथे सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : आपल्या विविध कलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात समाज प्रबोधन करणाºया जेष्ठ वृद्ध लोककलावंतांचा येथील हुडको कॉलनी स्थित संत गजानन महाराज संस्थान येथे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक चंदुभाऊ परळीकर े तर नगरसेविका दुर्गा जयस्वाल, लोक कलावंत निवड समितीचे सदस्य राजाराम राऊत,सिताराम महाराज दबडे, राजू जयस्वाल, कडोळे, विजय शेळके, सुखदेवरव शेंद्रे, गोपाल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते माणिकराव भोंडणे, विठलराव जोंधळे, लक्ष्मणराव इंगळे,नम्रता इंगळे, वेताळ महाराज व अन्य कलावंत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी चंदुभाऊ परळीकर म्हणाले वृद्ध लोक कलावंतांचे प्रबोधनाचे कार्य चांगले असून त्यांच्या सहकार्यासाठी आपण सदैव तत्पर आहो. तसेच कार्यक्रमात अनेक कलावंतांनी आपली कला सादर केली. तर हनुमंत महिला भजनी मंडळाने व्यसनमुक्ती पोवाडा सादर केला. यावेळी दिगंबर शिंगणे,दशरथ मोरे, विठ्ठल महाराज चौधरी,पांडे महाराज, भामुद्रे महाराज, सुधाकर क्षीरसागर, लक्ष्मण इंगळे, कांशीराम खडसे, राजेंद्र लांडगे, ललिता शिंगणे, सुप्रिया शेळके, ज्योती लांडगे, आश्विनी भोयर, महानंदाबाई मुंदे, ललिता राऊत,कुसुम गायकवाड, भिसे यांचेसह कलावंताची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मिटकरी सर यांनी केले तर आभार दत्ता राऊत यांनी मानले.