वाशिम जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी आशासेविकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:51 PM2017-12-01T14:51:57+5:302017-12-01T14:54:04+5:30
मानोरा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात गत सहा महिन्यांत उत्कृष्ट कामगिरी करणाºया आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
वाशिम: राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार आशा स्वंयसेविका योजनेंतर्गत १ डिसेंबर रोजी जिल्हाभरात आशा स्वयंसेविका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मानोरा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात गत सहा महिन्यांत उत्कृष्ट कामगिरी करणाºया आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य विभागाने २ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार १ डिसेंबर रोजी तालुका आणि जिल्हास्तरावर आशा स्वयंसेविका योजनांतर्गत आशा स्वयंसेविका दिवस साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या क ार्यक्रमात तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना सहभागी करून घेण्यासह गत सहा महिन्यांत ज्या आशा स्वयंसेविकांच्या कार्यक्षेत्रात एकही माता व नवजात बालकाचा मृत्यू झाला नसेल, अशा स्वयंसेविकांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यासह रांगोळी स्पर्धा, कविता वाचन, लेखन, सामान्य ज्ञान या सारख्या स्पर्धांचे आयोजन करणे आणि त्यामधील विजतेत्या आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. त्यानुसा मानोरा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आशा स्वयंसेविका दिवसाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाºया आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम हजारे, तालुका आरोग्य सहाय्यक डॉ. राजेंद्र मानके, तालुका समुह सघंटक भोळसे, आरोग्य सहाय्यीका दहापुते, यादव यांच्यासह सर्व गटप्रर्वतक यांनी सहकार्य केले.