खत खरेदी: शेतकऱ्यांकडून आता कॅशलेस पेमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:55 AM2020-07-08T10:55:40+5:302020-07-08T10:56:03+5:30
खते विक्रीसाठी कॅशलेस किंवा डिजिटल पेमेंट सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील सर्व खत विके्रत्यांकडे खते विक्रीसाठी कॅशलेस किंवा डिजिटल पेमेंट सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात कृषी संचालकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना ६ जुलै रोजी पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यात ही योजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात याची अमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे.
राज्यात १ नोव्हेंबर २०१७ पासूनच खत विक्री संदर्भात डीबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने राज्यात सर्व किरकोळ विके्रत्यांकडे ‘पीओएस, पीओएस डेस्कटॉप व्हर्जन’ स्थापित करुन कार्यान्वीत करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना त्यांचे विहित प्रणालीव्दारे ओळख पटविण्यात येऊन अनुदानीत खते उपलब्ध करुन देणे सोईचे झाले आहे. यास्तव अनुदानित खतांचा हंगामानिहाय सुनियोजित पुरवठा करण्यात येत आहे. तरी सदर खत व्यवहारांना सुचारु पध्दतीने चालना देण्यासाठी, राज्यातील सर्व खत विके्रत्यांकडे खते विक्रीसाठी कॅशलेस, डिजिटल पेमेंट सिस्टम लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व किरकोळ खत विक्रेत्यांना खत विक्रीसाठी दुकानात खत विक्रीसाठी डिजिटल पध्दतीने रक्कम स्विकारण्याचे आवाहन करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजवणी करणे आवश्यक असून, या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकाºयांना ६ जून रोजी पत्र पाठवून या प्रक्रियेची अमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
कार्यपालन अहवाल आयुक्तालयास
खत विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यपध्दतीचा वापर करण्यास जिल्हास्तरावरुन सर्व पातळीवर प्रसिध्दी करुन खत विक्रेते व शेतकयांमध्ये जागृती निर्माण करावी व त्याचा कार्यपालन अहवाल १५ जुलै २०२० पर्यत आयुक्तालयास सदर करावा. तसेच सध्या ज्या किरकोळ विक्रेत्याकडे अशी सुविधा उपलब्ध आहेत, त्याची पडताळणी करून त्याबाबतचा तपशील कृषी संचालकांच्या कार्यालयास केंद्र शासनास सादर करण्याच्या दृष्टीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, या प्रकरणी कोणत्याही स्तरावर प्रस्तावित केलेल्या कार्यवाहीस टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही केल्या आहेत.
‘यूपीआय, क्यूआर कोड पेमेंट सिस्टिम’
खत खरेदीतील कॅशलेस प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रथमदर्शनी सर्व किरकोळ खत विक्रेते त्यांच्याकडे यूपीआय क्यूआर कोड पेमेंट सिस्टिम कार्यान्वित करण्याचे निर्देश आपल्यास्तरावरुन देऊन त्यांची सर्व किरकोळ खत विक्रेते प्रभाविपणे अंमलबजाणी करत असल्याचे संदर्भात सनियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक स्वरुपात अमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सुचना कृषी संचालकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकाºयांना दिल्या आहेत.
डिजिटल पेमेंटसाठी आवश्यक सुविधा
कॅशलेस पेमेंटसाठी विक्रेत्यांनी जीपे, पेटीएम, फोनपे, अॅमेझॉन पे आदिसाठी कोणत्याही बँकेकडून युपीआय, क्यूआर कोड घेऊन. हे कोड दुकानाच्या दर्शनी भागांत शेतकºयांच्या खत खरेदीदरम्यान वापरासाठी ठेवावा लागणार आहे. या सर्व प्रक्रियेची पडताळणी संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना करावी लागणार आहे.