बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा; नागरिकांची गैरसोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 03:11 PM2019-05-12T15:11:32+5:302019-05-12T15:11:35+5:30
वाशिम : राष्ट्रीयकृत बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीयकृत बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
महा-ई-सेवा केंद्रांकडून चालविल्या जाणारे आधार नोंदणी केंद्र १७ जुलैपासून बंद झाले. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रीयीकृत बँका आणि पोस्टामध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, बहुतांश बँकांमध्ये ही सोय देण्यास टाळाटाळ होत असून आधार नोंदणी प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे.
राज्य, केंद्र शासनाची ‘यूआयडी अॅथोरिटी’ आणि महा आॅनलाईन कंपनीच्या जाचक अटींमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया जिल्ह्यातील ५४ महा ई-सेवा केंद्र संचालकांनी त्यांच्याकडे असलेले आधार नोंदणी यंत्र जिल्हा प्रशासनाकडे सोपवून १७ जुलैपासून आधार नोंदणी बंद केली. संबंधितांच्या मागण्या शासनस्तरावर अद्याप प्रलंबित असून त्यावर कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. बँकेत आधार नोंदणीची व्यवस्था केली. प्रत्यक्षात मात्र अनेक बँकांनी ही सोय देण्यास टाळाटाळ चालविल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.