वाशिम जिल्ह्यातील सहा शहरांमध्ये मुलभूत सुविधांचा बोजवारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:06 PM2018-02-07T15:06:37+5:302018-02-07T18:31:13+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांतर्गत नागरिकांना अपेक्षित मुलभूत सुविधा पुरविण्याकडे त्या-त्या नगर परिषदांचे दुर्लक्ष होत आहे. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते अशा सुविधांचा समावेश आहे.
वाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांतर्गत नागरिकांना अपेक्षित मुलभूत सुविधा पुरविण्याकडे त्या-त्या नगर परिषदांचे दुर्लक्ष होत आहे. त्यात प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते अशा सुविधांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातून विभक्त होत १ जुलै १९९८ रोजी वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. ७९३ महसूली गावे आणि सहा शहरे मिळून निर्माण झालेल्या या जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा या चार नगर परिषद; तर मालेगाव आणि मानोरा येथे नगर पंचायत कार्यान्वित आहे. दरम्यान, किमान शहरांच्या ठिकाणी प्रमुख चौकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला प्रसाधनगृह, सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी अशा मुलभूत सुविधा मिळणे नागरिकांना अपेक्षित आहे. मात्र, वर्षाकाठी या सुविधांकरिता शासनाकडून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी आणि नागरिकांकडूनही करापोटी वसूल केल्या जाणाºया निधीमधून ही कामे केली जात नसल्याची ओरड सर्वच स्तरांतून होत आहे. नगर परिषदांनी याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रसाधनगृहांअभावी महिलांची प्रचंड हेळसांड
समाजातील पुरूष मंडळी कुठेही आडोशाला जावून लघुशंका उरकू शकतात. मात्र, महिलांसाठी ही बाब कदापि शक्य नाही. त्यामुळे शहरांतर्गत वर्दळीच्या मुख्य चौकांमध्ये स्वतंत्र महिला प्रसाधनगृह असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही नगर परिषदेने ही सुविधा अद्याप उभी केलेली नाही. परिणामी, प्रसाधनगृहांअभावी महिलांची प्रचंड हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे.
‘सीसीटीव्ही’ उभारण्याकडे दुर्लक्ष!
शहरांमधील मुख्य चौक आणि बाजारपेठांंमध्ये नागरिकांची नियमित वर्दळ राहते. गर्दीचा फायदा उचलून अनेक भुरटे चोरही सक्रीय असतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता चौक आणि बाजारपेठांमध्ये ‘सीसीटीव्ही’ असणे अत्यावश्यक आहे. मात्र, जिल्ह्यात या सुविधेलाही प्रशासनाकडून सपशेल ‘कोलदांडा’ दिला जात असल्याचे दिसून येत आहे.